Home /News /viral /

VIDEO: शेजाऱ्यांच्या पार्टीच्या गोंगाटाने वैतागला तरुण, दरवाजा ठोठावून म्हणाला असं काही की.. हसू लागला शेजारी

VIDEO: शेजाऱ्यांच्या पार्टीच्या गोंगाटाने वैतागला तरुण, दरवाजा ठोठावून म्हणाला असं काही की.. हसू लागला शेजारी

2 मे रोजी जेस नावाच्या महिलेने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने आदल्या रात्री तिच्या घरी पार्टी केली असे कॅप्शन दिले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा शेजारी त्यांच्या घरी आला (Man went to neighbour's house to ask for party invite video) आणि त्यांच्याशी पार्टीबद्दल बोलू लागला.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 8 मे : अनेकदा लोक आपल्या घरी पार्टी करतात. मात्र, त्यामुळे शेजाऱ्यांना त्यांच्यामुळे किती त्रास होतो आहे, याकडे ते लक्षही देत ​​नाहीत. त्यांच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. असाच काहीसा प्रकार नुकताच एका व्यक्तीच्या बाबतीत घडला, जेव्हा त्याला शेजारच्या घरातून येणाऱ्या आवाजांमुळे रात्रभर झाप लागली नाही. दुसर्‍या दिवशी तो शेजाऱ्याच्या घरी तक्रार करायला पोचला. पण तिथे गेल्यावर तो असं काही बोलला की, शेजारीही (Man ask neighbour to invite him too for party) हसायला लागले. 2 मे रोजी जेस नावाच्या महिलेने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने आदल्या रात्री तिच्या घरी पार्टी केली, असं कॅप्शन दिले होते. दुसर्‍या दिवशी त्यांचा शेजारी त्याच्या घरी आला (Man went to neighbour’s house to ask for party invite video) आणि त्यांच्याशी पार्टीबद्दल बोलू लागला. तो माणूस घरातील गोंगाटाविषयी बोलू लागला, तेव्हा त्या महिलेला वाटलं की, तो तिच्याशी भांडायला आला आहे आणि त्यांच्या पार्टीमुळे त्याला झोप येत नव्हती, असा आक्षेप घेईल. पण घडलं उलटंच. गोंगाटाने वैतागलेल्या व्यक्तीनं म्हटलं असं काही की, शेजारी हसू लागले दरवाजाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस दरवाजाबाहेर उभा असलेला दरवाजाच्या कॅमेऱ्यातून आणि बाहेर लावलेल्या स्पीकरमधून दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याचं दिसत आहे. त्या व्यक्तीने कॅमेऱ्यात सांगितलं की, काल रात्री जी पार्टी सुरू होती, तेव्हा खूप आवाज आणि गोंगाट होता. तो म्हणाला की, काल रात्री त्यांच्याकडचा आवाज जोरजोरात येत होता. तो म्हणाला की, मला या गोष्टींचा त्रास नाही, पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लोक पार्टी कराल तेव्हा मलाही नक्की बोलवा. कारण मलाही पार्टी करायची आहे. हे वाचा - रातोरात झाला कोट्यधीश! खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण... लोकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या हे ऐकून आतील व्यक्ती जोरजोरात हसायला लागली. त्याने माफी मागितली आणि पुढच्या वेळेस त्याला पार्टीत बोलवण्याचं आश्वासन दिलं. हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून लोक त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 55 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 3 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केलं आहे. तसेच 35 हजारांहून अधिक रिट्विट्स आहेत. एका महिलेनं लिहिलं की, जर ती जेसच्या जागी असती तर, तिने त्या व्यक्तीला कधीही बोलावलं नसतं कारण ती त्याला ओळखत नव्हती. आधी तिने त्याला कॉफीसाठी बोलावलं असतं आणि नंतर पार्टीला बोलावलं असतं. जेसने याच व्हिडिओवर कमेंट करून आणखी एक व्हिडिओ शेअर केला आणि तिने त्या व्यक्तीला पुन्हा घरी कसं बोलावलं हेही सांगितलं.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Party, Social media viral, Video viral

    पुढील बातम्या