अहमदाबाद, 01 ऑक्टोबर : नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. जिथं तिथं गरब्याची धूम पाहायला मिळते आहे. कुणी गरबा खेळायला तर कुणी पाहायला जातं. अशी बरीच ठिकाणं आहेत जिथला गरबा प्रसिद्ध आहे आणि लोक तिथं आवर्जून गरबा पाहायला जातात. वेगवेगळ्या स्टाइलचे गरबा इथं पाहायला मिळतात. तुम्ही असे गरबा प्रत्यक्षात किंवा व्हिडीओत पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर गरब्याचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुम्ही कदाचित पाहिला नसावा. नवरात्रीत गरब्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नाही तर खरंतर नवरात्रीत तुम्ही काहीच पाहिलं नाही असंच म्हणावं लागेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गरब्यासाठी फेमस असलेल्या गुजरातमधीलच हा व्हिडीओ आहे. वडोदरामधील या गरब्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे वाचा - किचनपासून ते लडाखपर्यंत नवरात्रीचा जल्लोष, एका क्लिकवर पाहा हे हटके VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहिला शकता तुम्हाला एक चक्र दिसेल. झगमगत्या लाइट्सचं हे चक्र. पण तुम्हाला आश्चर्य वाटले हे लायटिंग केलंलं कोणतं चक्र नाही तर चक्क एक मैदान आहे, जिथं गरबा खेळला जातो आहे. मोठ्या मैदानाच्या अगदी मधोमध स्टेज, या स्टेजच्या मधून मैदानाच्या टोकापर्यंत जाणाऱ्या लाइट्सच्या माळा आणि मैदानात रंगीबेरंगी झगमगणारे गरब्याचे ड्रेस घालून आलेले लोक.
#WATCH | Gujarat: Devotees in large numbers play Garba in Vadodara Navratri festival VNF on the fifth day of Navratri in Vadodara (30.09)
— ANI (@ANI) October 1, 2022
(Video Source: VNF) pic.twitter.com/OJtwbNY5bd
माणसांनी खचाखच भरलेलं असं हे मैदान. ज्यात किंचितशीही जागा दिसत नाही आहे. लाइट्स आणि रंगीबेरंगी गरबा ड्रेस घालून आलेला माणसं यांच्यातील फरकच दिसून येत नाही आहे. हे वाचा - Video: सर्व मनोकामना पूर्ण करणारी अग्याराम देवी, 2706 अखंड ज्योतींनी उजळले मंदिर एएनआय वृतसंस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. वडोरदारातील गरब्याचे ड्रोनने टिपलेलं दृश्य आहे. या छोट्याशा व्हिडीओतून लोकांमधील गरब्याचा उत्साह झळकतो आहे. दृश्य पाहूनच मन प्रफुल्लित होतं.