उदयपूर 26 सप्टेंबर : नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि लोकांना वेध लागलेयत ते दांडियाचे. देशभरात हा व्हिडीओ साजरा केला जातो. तसेच अनेक लोक दांडिया सर्पर्धेचे आयोजन देखील करतात. यांसंदर्भात तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतू सध्या दांडियाचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. तसेच असा दांडिया तुम्ही कधीही पाहिला नसेल. बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की, गरबा-दांडिया हे मोठ-मोठ्या मैदानात किंवा हॉलमध्ये खेळले जातात. परंतू हा गरबा चक्कं स्विमिंग पूलमध्ये खेळला जात आहे. हा व्हिडीओ राजस्थान मधील असल्याची माहिती मिळत आहे, येथील एका संस्थेने गरब्याची ही आगळी-वेगळी कॉन्सेप्ट आणली, जी कदाचित यापूर्वी कधीही कोणी केलं नसेल. हे ही वाचा : Navratri 2022: नवरात्रीत न थकता गरबा खेळायचाय? निरोगी शरीर अन् सौंदर्यासाठी फॉलो करा खास टिप्स या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही तरुण आणि तरुणी गरबा-दांडियाचे पोशाख घालून स्विमिंग पूलच्या पाण्यात डान्स करत आहे.
#WATCH राजस्थान: उदयपुर में गरबा का आयोजन स्विमिंग पूल में किया गया। (23.09) pic.twitter.com/AIzqWi8rAL
— ANI_HindiNews (@AHindinews) September 23, 2022
तसे पाहाता राजस्थान आपल्या संस्कृतीसाठी नेहमीच ओळखला जातोय, त्यात आता चर्चा होतेय ती येथील आगळ्या-वेगळ्या गरब्याची हे ही वाचा : Navratri 2022 Wishes: दुर्गामातेच्या भक्तीत व्हा तल्लीन, नवरात्रौत्सवानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा शुभेच्छापर संदेश हा व्हिडीओ ANI च्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे, मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ राजस्थानच्या उदयपूर येथील आहे. या व्हिडीओल लोकांनी देखील पसंती दर्शवली आहे, ज्यावर लोक लाईक, शेअर देखील केरत आहे.