नवी दिल्ली, 23 एप्रिल : जग आणि जगातील विविध गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता असते. सोबतच गॅलेक्सीविषयी रहस्यमयी गोष्टी समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी लोकांचं आकर्षण असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी केलेले शोध नेहमीच एक चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय राहिला आहे. अशातच नासाने पृथ्वीविषयी एक अप्रतिम व्हिडीओ शेअर केलाय जो आत्ता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हा अप्रतिम व्हिडिओ शेअर करताना नासाने लिहिले की, ‘जग कसे पुढे जाते पाहा. आपला गृहग्रह वेगळ्या कोनातून पाहण्याच्या दुर्मिळ संधीसाठी ज्यांनी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अंतराळातील हा निळा संगमरवर 250 मैलांवरून सरळ वर पाहिल्यास खरोखर खूपच सुंदर आणि रोमांचक दिसतो. पृथ्वीविषयीचा हा रोमांचक, गूढतेने भरलेला व्हिडीओ शेअर करत नासाने लिहिले, ‘अल्ट्रा-हाय डेफिनिशन व्हिडिओ मार्च 2022 ते मार्च 2023 दरम्यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर एक्सपिडिशन 67 आणि 68 दरम्यान कॅप्चर करण्यात आला होता.’ ISS पृथ्वीभोवती 409 किमी उंचीवर प्रदक्षिणा घालत असल्याची माहितीही नासाने दिली. ते पृथ्वीची एक प्रदक्षिणा 90 मिनिटांत पूर्ण करते.
हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून 9 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लाईक्स आणि 2000 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. हा आश्चर्यकारक व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक व्हिडीओवर भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.