जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चक्क तलावातून निघतात देवांच्या मूर्ती; परिसरातही दिसते रहस्यमय सावली

चक्क तलावातून निघतात देवांच्या मूर्ती; परिसरातही दिसते रहस्यमय सावली

बिहारच्या तलावातून निघतात देवांच्या मूर्ती

बिहारच्या तलावातून निघतात देवांच्या मूर्ती

एका तलावात मागील 8 वर्षांमध्ये तीनवेळा खोदकाम झालं. या तीनही खोदकामांतून देवी-देवतांच्या मूर्ती आढळल्या.

  • -MIN READ Local18 Bihar
  • Last Updated :

राजाराम मंडल, प्रतिनिधी मधुबनी, 4 जून : आपली भारतभूमी अनेक रहस्यांनी दडलेली आहे. अनेक भागांमध्ये जमिनीखाली धार्मिक अवशेष आढळतात. परंतु तुम्ही कधी तलावात प्राचीन अवशेष आढळल्याचं ऐकलंय का? बिहारच्या मधुबनी भागात असं घडलंय. जिल्ह्यातील एका तलावात गेल्या काही वर्षांपासून खोदकाम सुरू होतं. या खोदकामात अनेक देवी, देवतांची मूर्ती सापडली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सैनी पंचायतीच्या या तलावात मागील 8 वर्षांमध्ये तीनवेळा खोदकाम झालं. या तीनही खोदकामांतून देवी-देवतांच्या मूर्ती आढळल्या. त्यामुळे येथील लोकांना प्रश्न पडलाय की, याठिकाणी असं काय रहस्य आहे जे आम्हाला अजूनही माहिती नाही. शिवाय येथे आणखी काही गोष्टी दडलेल्या असण्याची शक्यताही लोकांच्या मनात आहे. येथे सापडलेली भगवान विष्णू यांची 4 फूट उंच मूर्ती तब्बल 400-500 वर्ष जुनी असू शकते असं तिच्या खडकावरून दिसून येतं. हा खडक आता मिळणं दुर्मिळ आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. Airplanes Facts: फोटोंवरुन समजून घ्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा, एकूण किती दरवाजे असतात? याच गावात राहणारे 65 वर्षीय श्रीप्रसाद मुखिया हे या तलावाची देखभाल करतात. त्यांनी रात्रीच्या सुमारास तलावाभोवती एक भयानक सावली पाहिली होती. याबाबत गावकऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं, सावलीबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही, परंतु याठिकाणी नागदेवतेचा वास आहे. लोकांनी त्याला अनेकदा पाहिलंय. त्यामुळे या तलावात किंवा तलाव परिसरात कोणी काहीच गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचबरोबर गांवकऱ्यांचं म्हणणं असंही आहे की, शेकडो वर्षांपूर्वी याठिकाणी एक मंदिर होतं, जे बाबरने उद्ध्वस्त केलं. परंतु आता या मंदिराचा कोणताही पुरावा गावात नाही. परंतु तलावात आढळणाऱ्या वस्तूंनुसार जमिनीच्या आत काहीतरी मोठं रहस्य असण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात