नवी दिल्ली, 30 जुलै : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलीसच मनमानी कारभार करीत हत्या करू लागले तर त्या शहराच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. गुन्हेगाराला शोधणे हे पोलिसांचे काम असते तर त्यांना शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्था करते. मात्र जर पोलीसच स्वत: न्यायव्यवस्थेच्या जागी उभी राहिली तर सर्वत्र अराजकता माजेल. नवी दिल्लीतील हा व्हिडीओ पाहून हिच चिंता व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडीओ दिल्लीच्या पूर्वेकडील न्यू अशोका नगर भागातील आहे. येथे एका कॉन्स्टेबलला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस एक व्यक्ती बेपत्ता झाल्याचा तपास करीत होते. त्या दरम्यान एक व्हिडीओ त्यांच्या हाती लागला. त्यानंतर या घटनेचा नेमका खुलासा झाला. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. (Murder by police Shocking VIDEO in the hands of the authorities while searching for the missing youth)
काय आहे या व्हिडीओत..
या व्हिडीओमध्ये न्यू अशोक नगर पोलीस ठाण्याचे शिपाई मोनू सिरोही एका तरुणाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करीत आहेत. अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्यानंतर जखमी तरुणाला कॉन्स्टेबल मोनू आपल्या मित्रांसह त्याला एका कारमध्ये टाकतो. हाच तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या तरुणाचं नाव अजित असल्याचं समोर आलं आहे. अजित हा दिल्लीतील कोंडली भागात राहणारा आहे.
हे ही वाचा-रेल्वे कर्मचाऱ्याची गाडी घसरली; बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला बघून पत्नीचा तांडव
हा व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती जवळील इमारतीमध्ये असल्याची शक्यता आहे. या व्यक्तीचंही कौतुक केलं जात आहे. या व्हिडीओमुळे नेमका प्रकार समोर आला व पोलिसाचा खुलासा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi Police, Live video, Shocking news, Shocking viral video