मुंबई, 21 जून : आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. कित्येक महिला ब्युटी ट्रिटमेंटही घेतात. पण ही ब्युटी ट्रिटमेंट काही वेळा महागातही पडू शकते. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात एका तरुणीने महागडं फेशिअल केलं. पण त्या फेशिअलमुळे तिच्या चेहऱ्याची वाट लागली आहे. तिचा चेहरा इतका भयानक झाला आहे की तो आता कुणाला दाखवायलाही तिला लाज वाटते आहे. मुंबई तील हे प्रकरण आहे. फेशिअल अगदी 500 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत असतात. फेशिअल कुठे करत आहोत, त्यासाठी वापरले जाणारे प्रोडक्ट आणि करण्याची पद्धत यावर फेशिअलची किंमत असते. जितका महागडा फेशिअल तितका तो चांगला असं अनेकांना वाटतं. पण महागडं फेशिअही महागात पडू शकतं, याचा प्रत्यय आला तो मुंबईतील 23 वर्षांच्या तरुणीला. अंधेरीतील कामधेनू शॉपिंग सेंटरमधी एका पार्लरमध्ये ती गेली होती. हे मोठं पार्लर होतं, जिथं तिने महागडं फेशिअल करून घेतलं. याची किंमत 17,000 रुपये होती. हे साधंसुधं फेशिअल नव्हतं. तर हायड्रा फेशियल होतं. त्वचा तज्ज्ञांच्या मते, हायड्रा फेशियल हे एक प्रकारचे मल्टी स्टेप स्किन ट्रीटमेंट आहे जे मशीनद्वारे केलं जातं. यामुळे त्वचा हायड्रेटेड होते, ती स्वच्छ होते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात. फेस मास्क वापरताय सावधान! तरुणीची भयंकर अवस्था; VIDEO पाहूनच हादराल पण ही महिला जेव्हा ती फेशियल करत होती तेव्हापासूनच तिच्या चेहऱ्यावर जळजळ सुरू झाली. महिलेने सांगितले की, जेव्हा पार्लर कर्मचाऱ्यांनी चेहऱ्यावर क्रीम लावले तेव्हा चेहऱ्यावर आग लागल्यासारखं वाटलं. तिने याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यांनी तिला ही पद्धत सर्वांनाच सूट होते, असं नाही. हे आपोआप कमी होईल, असं सांगण्यात आलं. पण महिलेच्या चेहऱ्यावरील जळजळ कमी होण्याऐवजी वाढली. तिच्या चेहऱ्यावर खुणा दिसू लागल्या. तिचं कुटुंबही तिला पाहून घाबरलं. फेशिअल केल्याच्या दुसर्या दिवशीच तिने रुग्णालयात धाव घेतली. कूपर हॉस्पिटलमधील त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितलं की, हे कायमचे नुकसान होऊ शकते, एकतर खराब दर्जाची उत्पादने वापरल्यामुळे किंवा उत्पादनांचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे असं झालं. पैसे वाचवण्यासाठी मॉडेलने केली स्वस्त सर्जरी, रातोरात झाली अशी भयाण अवस्था या महिलेला मनसे नगरसेवक प्रशांत राणे यांचा पाठिंबा मिळाला, त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात ग्लो लक्स सलूनविरोधात तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 337 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.