मुंबई, 14 फेब्रुवारी : वसईतील काल(दि.13) एका वाहन चालकाने सिग्नल तोडल्यानंतर त्याला अडवणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला जोरदार धडक दिली. याचबरोबर वाहतूक पोलिसासह तब्बल एक किलोमीटर गाडी फरफटत रेंज ऑफिस नाक्यापर्यंत नेली गेली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना काल (दि.13) संध्याकाळी साडेसात च्या सुमारास घडली. सोमनाथ चौधरी असे वाहतुक पोलिसाचे नाव आहे.
पोलीस हवलदार ते ट्राफिक पोलीस म्हणून आपली ड्युटी बजावत असताना ही घटना समोर आली आहे. दरम्यान i20 कार चालकाला सोमनाथ चौधरी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. कार चालक न थांबत पोलिसाला जोरदार धडक दिली.
हे ही वाचा : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 17 महिलांना कारने उडवलं, 5 जणींचा मृत्यू
दरम्यान या धडकेत चौधरी आणि गाडीच्या बोनेटवर जाऊन पडले. दरम्यान स्वतःला सावरत बोनेटला घट्ट पकडून राहिले असताना चालकाने गाडी न थांबवता चक्क एक किलोमीटर बोनेटवर भरधाव वेगाने फरफटत नेले त्यांच दैव बलवत्तर म्हणून ते वाचले…
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपी हा बारावीमध्ये शिकत असून 19 वर्ष आहे. याच्याकडे लायसन देखील नाही आणि याने सिग्नल देखील तोडला होता. त्यामुळे याच्यावर कलम लावलेला आणि याच्या सोबत आणखीन एक जण होता त्याने तो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता.
हे ही वाचा : भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं, 100 फूट नेलं फरफटत, तिघांचा जागीच मृत्यू
परंतु थांबवून दिलं नाही आणि उलट सांगतो की मर राहा है तो मरने दो असं त्याला सांगितलं. म्हणजे पोलीस हवालदाराला मारण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचं हे पोलीस तपासात समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Mumbai crime branch, Mumbai police, Mumbai police attack, Viral video.