राजगुरूनगर, 14 फेब्रुवारी : पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिली आहे. या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ असलेल्या शिरोली परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. (धक्कादायक! प्रियकर भाऊ असल्याचं भासवत पतीला दिलं विष, वाचा कसा झाला खुलासा) पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्याचवेळी महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना ठोकर देऊंन वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून वाहनासह फरार झाला. (Nashik : रेल्वे स्टेशनवर मिळणार शुद्ध हवा, पाहा कसं आहे देशातील पहिलं ऑक्सिजन पार्लर! Video) या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी आहे. जखमी महिलावर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. फरार वाहन चालकाचा खेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.