जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मायलेकाला वाचवण्यासाठी RPF जवानाने चालत्या ट्रेनवर घेतली उडी शेवटी...; मुंबईतील थरारक VIDEO

मायलेकाला वाचवण्यासाठी RPF जवानाने चालत्या ट्रेनवर घेतली उडी शेवटी...; मुंबईतील थरारक VIDEO

प्रवाशांना वाचवण्यासाठी धावला आरपीएफ जवान.

प्रवाशांना वाचवण्यासाठी धावला आरपीएफ जवान.

मुंबईत ट्रेनमधून पडणाऱ्या महिला आणि तिच्या मुलाला वाचवण्यासाठी आरपीएफ जवानाने आपल्या जीवाची बाजी लावली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 नोव्हेंबर :    रेल्वे अपघाता चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मुंबईत चालत्या ट्रेनमधून एक महिला आणि मुलगा पडणार होते. त्यांना वाचवण्यासाठी म्हणून आरपीएएफ जवान देवदूतासारखा धावून आला. एखादा सुपरहिरो असावा तशी त्याने चालत्या ट्रेनवर उडी मारली. बचावाचा हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्टेशनवरील या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ट्रेन सुरू होते. तरी एक महिला आपल्या मुलासह ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते आणि ती घसरून पडते. महिला आणि मुलगा ट्रेनसह प्लॅटफॉर्मवरून फरफटत जातात. त्यावेळी तिथं असलेला आरपीएफ जवान क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी धावतो. मायलेकाला वाचवण्यासाठी तो आपल्या जीवाची बाजी लावतो. चालत्या ट्रेनवर तो उडी घेतो आणि मायलेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे वाचा -  VIDEO - ट्रेनचा हॉर्न वाजत होता, लोक ओरडत होते; तरी रेल्वेसमोर आपल्याच धुंदीत चालत राहिली महिला आणि… ट्रेन वेग धरते तरी तो दरवाजात अडकलेल्या त्या मुलाला सोडत नाही. शेवटपर्यंत धरून ठेवतो. अखेर तो त्या मुलाला आपल्या हातात धरून ट्रेनमधून बाहेर खेचतो आणि प्लॅटफॉर्मवर पडतो. ट्रेन वेगात असल्याने आरपीएफ जवान प्लॅटफॉर्मवर फेकला जातो. पण त्यावेळी तो त्या मुलाला काही होऊ देत नाही. त्याला अगदी त्याने कुशीत पकडून धरल्याचं दिसतं. फिल्ममधील एखाद्या हिरोने कुणाचे तरी प्राण वाचवावेत अगदी तसाच हा सीन दिसतो आहे. काही वेळाने एक महिला त्यांच्या दिशेने धावत येते. ही महिला या मुलाची आई. कदाचित ती आधी ट्रेनमधून पडली पण मुलगा आतच राहिला. ज्याला या जवानाने वाचवलं. हे वाचा -  नक्की चूक कोणाची? सहा सेकंदांचा Video पाहून उडेल थरकाप हे संपूर्ण दृश्य स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. त्यानंतर आपला जीव धोक्यात टाकून मायलेकाचा जीव वाचवणाऱ्या या जवानाचं कौतुक केलं जातं आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.

या व्हिडीओवर तुमची काही प्रतिक्रिया असेल तर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात