मुंबई, 09 ऑगस्ट : टिंडर आणि इतर डेटिंग अॅप्सवरून आपला लव्ह पार्टनर शोधण्याचा अलिकडे ट्रेंड आहे. मात्र, एखादा व्यक्ती कोणत्या गोष्टीचा कसा फायदा घेईल हे सांगता येत नाही. रक्षाबंधनला स्वतःसाठी बहीण शोधण्यासाठी एकाने डेटिंग अॅपचा वापर केला. “रक्षाबंधनसाठी बहीण शोधत आहे,” हे त्याचे टिंडर बायो चांगलेच चर्चेचा विषय ठरले. अनेकांना हे हास्यास्पद वाटत असले तरी मुंबईतील या माणसाची रणनीती कामी आली आणि त्याने स्वतःला एक नाही तर दोन बहिणी मिळवल्या आहेत. त्यामुळे त्याचे रक्षाबंधन आनंदात साजरे होईल. राखी-रक्षाबंधनसाठी दोन बहिणी शोधण्यात मदत केल्याबद्दल त्या व्यक्तीने टिंडरचे आभार मानले. “टिंडरचे आभार, आता मला दोन बहिणी आहेत, ज्या मला टिंडरवर भेटल्या होत्या. या वर्षी आम्ही तिघेजण एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे करण्याचा आणि भेटवस्तू आणि इतर देवाणघेवाण करण्याचा विचार करत आहोत. मी खूप आनंदी आहे, असेही त्याने लिहिले आहे. या Reddit.युजरने आपल्याला आयुष्यभर रक्षाबंधनाच्या दिवशी FOMO कसे वाटत होते, हे समजावून सांगितले कारण त्याला बहीण नाही आणि त्यामुळे त्याला राखी बांधण्यासाठी कोणीही नव्हते. रक्षाबंधनाच्या सणाला तो कोणसाठीही भेटवस्तू खरेदी करू शकत नव्हता. रक्षाबंधनासाठी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी त्याने आपला टिंडर बायो बदलला होता, गेल्या दोन वर्षांपासूनही तो बहिणीच्या शोधात आपला बायो बदलत होता. या वर्षी मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याला बहिणी सापडल्या. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे अलीकडेच अशाच एका प्रकरणात, केरळमधील एका व्यक्तीने मुंबईत अपार्टमेंट शोधण्यासाठी डेटिंग अॅप बंबल वापरल्याची माहिती ट्विटरवर व्हायरल झाली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजरने नुकतेच एका माणसाच्या बंबल प्रोफाईलचे स्क्रीनशॉट शेअर करून याची माहिती दिली होती.
no YOU'RE looking for a soulmate on bumble, he's looking to rent a place in bombay pic.twitter.com/s9dfzM3Xfv
— mitski doi (@superachnural) June 15, 2022
एका ट्विटर वापरकर्त्याने ‘जिनियस’च्या या गोष्टीचे कौतुक केले आणि लिहिले होते की, “बंबलवर, बरेच लोक हृदयातील जागा शोधतात, परंतु तो फ्लॅटची जागा शोधत आहे.”