मुंबई, 23 जानेवारी : ऑनलाइन फूड ऑर्डर करताना खवय्यांची सर्वाधिक पसंती बिर्याणीला असल्याचं कंपन्यांनी त्यांच्या अहवालात सांगितले होते. झोमॅटोने त्यांच्या २०२२ च्या अहलावात म्हटलं होतं की, आधीच्या तुलनेत बिर्याणीच्या ऑर्डर जास्त होत्या. तसंच स्विगीनेही त्यांच्याकडे चिकन बिर्याणी ही डीश सर्वाधिक ऑर्डर करण्यात आली. तर दर मिनिटाला १३७ ऑर्डर आल्याचंही कंपनीने म्हटलं. दरम्यान, आता अशी माहिती समोर आलीय की, मुंबईतील एका मुलीने जेवण ऑर्डर करण्यासाठी फोन उचलला तेव्हा तिने बिर्याणीचा पर्याय निवडला. पण ती दारुच्या नशेत होती आणि तिने बिर्याणी चक्क दुसऱ्या राज्यातून मागवली होती.
मुंबईत दारुच्या नशेत असणाऱ्या मुलीने चुकून बंगळुरूतील मेघना फूड्स रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीची ऑर्डर दिली. जवळपास अडीच हजार रुपयांची ऑर्डर तिने दिली होती. तसंच जेव्हा तिला आपण बंगळुरूत ऑर्डर दिली हे समजलं तेव्हा रेस्टॉरंटने तिची ऑर्डर स्वीकारली म्हणून ती आनंदी होती. तिने आपल्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि म्हटलं की, मी बंगळुरुहून अडीच हजार रुपयांची बिर्याणी मागवली होती का?
हेही वाचा : भारतीय लग्नात फॉरेनर बॅंडवाले; Video चा इंटरनेटवर धुमाकूळ
तरुणीने ट्विटरवर २१ जानेवारी रोजी पोस्ट केलं होतं. यावर झोमॅटोनेसुद्धा कमेंट केली आहे. झोमॅटोने म्हटलं की, सुबी तुम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर आनंद होईल. आम्हाला तुमचा अनुभव नक्की सांगा.
best decision ever, @zomato where is my paycheck 👉🏼👈🏼 pic.twitter.com/eqBD1NfSsd
— subiii (@_subiii_) January 22, 2023
दरम्यान, या ट्विटवर इतर युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी विचारलं की, झोमॅटोने ऑर्डर कशी स्वीकारली. तर काहींनी इंटरसिटी डिलिव्हरी सेवा सुरु करण्याची संधी असल्याचं म्हटलं आहे.
best decision ever, @zomato where is my paycheck 👉🏼👈🏼 pic.twitter.com/eqBD1NfSsd
— subiii (@_subiii_) January 22, 2023
इतकंच नाही तर तरुणीला तिची बिर्याणीची ऑर्डर मिळाली आणि त्याचे फोटोही तिने शेअर केले आहेत. यामध्ये बिर्याणी, सॅलड, रायता आणि चिप्स होते. आतापर्यंतचा सर्वात चांगला निर्णय. झोमॅटो, माझी सॅलरी कुठे आहे? असा मजेशीर प्रश्नही तिने विचारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zomato