नवी दिल्ली, 23 जानेवारी : भारतीय लग्नांमध्ये लग्न खास बनवण्साठी अनेक खास गोष्टी केल्या जातात. यामधील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे बॅंड बाजा. बॅंड बाजामुळे लग्नसमारंभात शोभा येते. अनेक लग्नात आवर्जुन वेगवेगळ्या प्रकारचे हटके बॅडवाले बोलावले जातात. जर तुम्ही कोणत्या पंजाबी कुटुंबातील असाल तर मग फक्त बॅंड बाजाच नाही तर त्याच्यासोबत ढोल-ताशेही पहायला मिळणारच आणि पंजाही भांडडा तर आहेच. अशा प्रकारच्या लग्नांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. सध्या एका भारतीय लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये बॅंडवाले ब्रिटिश असलेले पहायला मिळत आहे. यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलंच लक्ष वेधत आहे. या बॅडच्या आणि ढोल ताशाच्या आवाजाने तुम्हालाही डान्स करण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये सगळेच मस्त डान्स करताना दिसतायेत.
Angrezon se band and dhol bajwa rahe hain Punjabi :). Classic Revenge by Indians.
( on a lighter note guys) pic.twitter.com/DPmp5UByRZ — Gurmeet Chadha (@connectgurmeet) January 20, 2023
हा व्हायरल होणारा व्हिडीओ गुरमीत चढ्ढा या व्यक्तीने ट्विटवर शेअर केला आहे. गुरमीत चढ्ढा संपूर्ण सर्कल हेल्थ सोल्यशुनचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत. ते अनेकदा व्यवसाय आणि गुंतवणुकीची संबंधीत ट्वीट करत असतात. त्यांनी हा लग्नाचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं, 'पंजाबी फॉरेनरला बॅंड ढोल वाजवायला लावत आहेत'.
दरम्यान, हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून त्याच्यावर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. लोक व्हिडीओवर व्यक्त होत असून लाईक्सचाही वर्षाव करत आहेत. यापूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media viral, Viral, Viral news, Viral video.