नवी दिल्ली, 23 जानेवारी : लग्न आणि लग्न परंपरा या प्रत्येक ठिकाणानुसार, धर्मानुसार, देशानुसार आणि जागेनुसार निरनिराळ्या असलेल्या पहायला मिळतात. प्रत्येकाची लग्नाची पद्धत वेगळी असलेली पहायला मिळते. काहीजण आपलीच नवी परंपरा म्हणजेच आपल्या आवडीनुसार काही गोष्टी करतात. लग्नाच्या दिवशी आपण चांगलं दिसावं यासाठी प्रत्येक मुलगा मुलगी खास तयारी करतात. विशेषतः होणारी नवरी. लग्नाच्या दिवशी आपण सुंदर आणि परफेक्ट दिसावं असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं त्यामुळे ती शक्य असेल तितके प्रयत्न करते. मात्र एक अशीही परंपरा आहे ज्याठिकाणी होणाऱ्या नवरीवर चिखल फेकला जातो. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटलं असेल पण नक्की ही परंपरा काय आहे याविषयी जाणून घेऊया.
लग्नाशी संबंधित अनेक अनोख्या परंपरा जगभरात पहायला मिळतात. मात्र स्कॉटलॅंडमधील एका गावात लग्नाआधी होणाऱ्या नवरीवर चिखलाचा वर्षाव केला जातो. या प्रथेनुसार होणाऱ्या नवरीवर सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी फेकल्या जातात. काही ठिकाणी लग्नाआधी वधू-वर एकमेकांवर चिखल आणि अंडीदेखील फेकतात.
हेही वाचा - लग्नानंतर महिला सिंदूर का लावतात? यामागे काय आहे कारण
चिखल फेकण्याची परंपरा नक्की काय?
वधू-वराला घाणेरड्या गोष्टींनी अंघोळ घालण्याच्या या प्रथेला ब्लैकनिंग दी ब्राइड म्हणजेच वधूला काळं फासणं असं म्हटलं जातं. स्कॉटलॅंडच्या उत्तर पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये ही परंपरा मुख्यतः दिसून येते. यामध्ये वधू-वरांवर शाई फेकली जाते आणि काजळीही लावली जाते. स्कॉटलॅंडच्या गावांमध्ये वधूवर फेकण्यात येणारी घाण, काळी शाई, चिखल, काजळी, अंडी, कुजलेले अन्न, काळा रंग फेकणं शुभ लक्षण मानलं जातं. त्यांचा असा विश्वास आहे की, वधू-वर नव्या जीवनात प्रवेश करताना त्याचं वैवाहित जीवन सुखाचं, आनंदाचं जातं.
स्कॉटलंडमधील प्रथेनुसार, लग्न गुलाबासारखं सुंदर नसून त्यात अनेक अडचणी येतात आणि दोघांनी मिळून या समस्यांना सामोरं जावं लागतं. एबरडीन विद्यापीठातील संशोधनानुसार, ही प्रथा 19 व्या शतकातील आहे, जेव्हा विवाहादरम्यान महिलांचे पाय स्वच्छ करण्यासाठी स्टोव्हची काजळी वापरली जात असे. 20 व्या शतकाच्या शेवटी, ती एक मजेदार विधी बनली ज्यामध्ये वधू आणि वर दोघांवर घाणेरड्या गोष्टी फेकल्या गेल्या.
दरम्यान, फक्त ही परंपराच नाही तर अशा अनेक विचित्र आणि मजेशीर परंपरा आहेत. अशा परंपरांमुळे हे क्षण आणखीनच खास बनतात जे आयुष्यभर लक्षात राहतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Top trending, Viral, Viral news, Wedding, Wedding rules