जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - तोंडाची आग होतेय तरी हसत हसत मिरची खाते ही चिमुकली; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

VIDEO - तोंडाची आग होतेय तरी हसत हसत मिरची खाते ही चिमुकली; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

VIDEO - तोंडाची आग होतेय तरी हसत हसत मिरची खाते ही चिमुकली; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

चेहऱ्यावर गोड हसू, डोळ्यात पाणी! मिरची खाणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ होतेय व्हायरल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 जानेवारी : लहान मुलं म्हटलं की ते चॉकलेट, आईसस्क्रीम किंवा असे काही गोड पदार्थ त्यांना खायला आवडतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) एका अशा मुलीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, जिच्या हातात आणि तोंडात चॉकलेट, आईस्क्रीम नाही तर चक्क मिरची आहे. ही चिमुकली मिरची खाताना दिसली (Little girl eating chilli for money). तुम्हाला तिखट आवडो अगर न आवडो  मिरची चावताच तोंडात जळजळ होते, चेहरा लालबुंद होतो, पोटात आग होते. असं असताना ही छोटी मुलगी मात्र अगदी हसत हसत मिरची खाते आहे (Little girl eating chilli video). पुष्पक महाजन नावाच्या युट्यूब युझरने आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर बसलेल्या या मुलीच्या हातात एक मिरची आहे. ती मिरची खाते. मिरची चावताच सामान्यपणे आपली प्रतिक्रिया कशी असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण ही एवढीशी मुलगी मात्र हसताना दिसते. हे वाचा -  VIDEO - ‘जादुई’ ब्लँकेट! हातात पडताच व्हिलचेअरवरील दिव्यांग व्यक्तीही चालू लागली याचं कारण तिला मिरची आवडते असं नाही किंवा तिने तुमच्या आमच्याप्रमाणे कुणीसोबत मिरची खाण्याची स्पर्धाही लावलेली नाही. तर तिला ही मिरची खावी लागतेय ती गरजेपोटी.

या मुलीचं मिरची खाण्याचं कारण ऐकून तुमचं मन सुन्न होईल. फक्त काही पैशांसाठी तिच्यावर मिरची खाण्याची वेळ ओढावली. तुम्ही व्हिडीओ पाहिला तर हसत हसत मिरची खाल्ल्यानंतर या मुलीच्या डोळे पाण्याने भरतात. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. त्यानंतर ती हात वर करत आपल्या हातातील पैसे दाखवताना दिसते. मिरची खाऊन दाखवल्यानंतर तिला हे पैसे मिळाले आहेत. हे वाचा -  विद्यार्थीनीचा Naach Meri Rani गाण्यावर डान्स; 19 लाखाहून अधिकांनी पाहिला VIDEO पैशांशिवाय माणसाचं काही चालत नाही. ऐशोआरामाचं जीवन सोडा, साधं पोट भरायचं असेल तरी पैसा हा लागतोच. त्यामुळे पैशांसाठी माणूस काहीही करू शकतो. अशीच वेळ या चिमुकलीवरही आली आहे. त्यामुळे मिरची खाल्ल्यानंतर होणाऱ्या परिणामांपेक्षा तिला हे पैसे मिळाल्याचा आनंद जास्त आहे. त्यामुळेच मिरची खाल्ल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात