जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालत्या रुग्णवाहिकेला लागली आग... भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

चालत्या रुग्णवाहिकेला लागली आग... भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

व्हायरल

व्हायरल

काही सेकंदात खूप भयावह अपघात डोळ्यासमोर होत असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली असून याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: अशा अनेक घटना समोर येत असतात ज्या अगदी अचानकपणे घडतात. काही सेकंदात खूप भयावह अपघात डोळ्यासमोर होत असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली असून याचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावर धावणाऱ्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील सीकर येथे ही भयावह घटना घडली असून यामुळे जिल्ह्यातील नीमकठाणा येथे गोंधळ उडालेला दिसून आला. रस्त्यावर धावणारी रुग्णवाहिका अचानक पेट घेते. रेल्वे ओव्हरब्रिजवर अचानक 108 रुग्णवाहिकेने पेट घेतला. अचानक आग लागलेल्या रुग्णवाहिकेचा चालक आणि ईएमटी यांनी कशीतरी उडी मारून त्यांचे प्राण वाचवले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी जमा झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली.

या अपघाताची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर रस्ता वाहनांसाठी खुला करण्यात आला आणि बऱ्याच वेळानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ड्रायव्हर राम सिंह आणि ईएमटी महेश कुमार यांनी रुग्णवाहिकेतून उडी मारून त्यांचे प्राण वाचवले. रामसिंग म्हणाले, ‘अॅम्ब्युलन्सच्या अ‍ॅक्सिलेटरची तार खराब झाली. नवीन वायर टाकण्यात आली. मेकॅनिक म्हणाला होता, एकदा ऍम्ब्युलन्स चालवून बघ. वाहनाने केवळ 150 मीटरचा प्रवास केला होता आणि ते ठिकाणाकडे जात असताना अचानक आग लागली. सुदैवाने रुग्णवाहिकेला आग लागली तेव्हा त्यात एकही रुग्ण नव्हता. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात