जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मित्राला टायरमध्ये बसवलं आणि उंचावरुन दिलं ढकलून, पुढच्याच क्षणी घडलं....पाहा Video

मित्राला टायरमध्ये बसवलं आणि उंचावरुन दिलं ढकलून, पुढच्याच क्षणी घडलं....पाहा Video

मित्राला टायरवर बसवलं आणि दिलं ढकलून

मित्राला टायरवर बसवलं आणि दिलं ढकलून

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्याशिवाय मजा मस्ती करणं अवघड होऊन जातं. जोपर्यंत मित्र आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपण कोणतीही रिस्क घ्यायला, मस्ती करायला तयार असतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जून : आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्याशिवाय मजा मस्ती करणं अवघड होऊन जातं. जोपर्यंत मित्र आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपण कोणतीही रिस्क घ्यायला, मस्ती करायला तयार असतो. मित्रांच्या मजा मस्तीचे असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच असाच काहीसा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये काही मित्र मैत्रिणी डोंगराळ भागात मजा करताना दिसतायेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणी त्यांच्या मित्राला टायरच्या एका मोठ्या छिद्रात बसवतात. नंतर हा टायर उताराच्या दिशेने ढकलून देतात. टायर एवढ्या स्पीडने खाली जातो की, रस्त्यावर आलेल्या कारच्या अगदी जवळून जातो. थोडक्यात कार आणि टायरची धडक होण्यापासून वाचते. या संपूर्ण घटनेदरम्यान त्या तरुणी मित्राच्या मागे धावतात कारण त्यांनाही असे वाटू लागते की असे करून आपण चूक केली आहे. यामुळे काहीतरी दुर्घटना होई शकते. मात्र पुढच्याच क्षणी टायरमधील व्यक्ती हात वर करुन ती ठीक असल्याचं सांगते. मग ते पाहून तरुणी खूप खूश होतात आणि उड्या मारायला लागतात.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ @NoContextHumans नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओवर विविध कमेंट येतानाही दिसत आहे.

जाहिरात

दरम्यान, सोशल मीडियावर असे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये मित्र ग्रुपमध्ये अनेक खोडसाळपणा करतात हे दिसून येतं. काही वेळातच असे व्हिडीओ चर्चेत येतात. मात्र कधी कधी अशी मस्ती करणं तरुणांना महागात पडतं आणु दुखापतही होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात