नवी दिल्ली 27 जुलै : अपघात कधीच सांगून होत नाहीत. ते कधी, कसे आणि कोणासोबत होतील, हे कोणीच सांगू शकत नाही. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात ज्यामध्ये अचानक छत कोसळल्याने अनेक लोक आत गाडले गेल्याचं पाहायला मिळतं. असाच एक व्हिडिओ आजकाल पुन्हा पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये एक आई आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुलाचा जीव वाचवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक भयानक घटना घडताना दिसते. जेव्हा घराचं छत कोसळतं तेव्हा एक आई आपल्या मुलासह घरात असते. यानंतरचं दृश्य खूपच भीतीदायक आहे.
The #ceiling of a residence in Phnom Penh, #Cambodia, #collapsed in the living room. Luckily, the #mother inside the house acted quickly, picking up one child with one hand and holding a school bicycle having another child with the other. All her children were saved in the end. pic.twitter.com/aK9wXVsTvW
— HKeye (@Warm_Talking) July 18, 2023
आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, असं म्हणतात. याचाच प्रत्यय या व्हिडिओतही पाहायला मिळत आहे. आईने मोठं शौर्य दाखवत आपल्या मुलाला घराबाहेर काढलं. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना कंबोडियातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घराचं छत कोसळणार असल्याची जाणीव होताच आई मुलाला उचलून घेत बाहेर पळते. आणखी दोन मुलं तिच्या मागे धावतात, परंतु एक लहान बाळ बेबी वॉकरमध्ये घरातच राहातं. हे लक्षात येताच आई त्या बेबी वॉकरला घ्यायला परत जाते आणि आपल्या सोबत घेत बाहेर पळते. ती बेबी वॉकर घेऊन तिथून दूर जाताच धाडकन छत कोसळतं Viral video : सुसाट कारनं आधी बाईक नंतर विद्यार्थ्यांना उडवलं, पाहा थरारक VIDEO बेबी वॉकरमध्ये बसलेल्या आपल्या लहान मुलाला आई कशी बाहेर काढते हे व्हिडिओच्या दुसऱ्या फ्रेममधून स्पष्टपणे दिसत आहे. एक सेकंदही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. या व्हिडिओवर एका यूजरने लिहिलं की ‘मॉम इज गॉड’. इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.