मुंबई, 20 जुलै : सोशल मीडियावरील व्हिडीओ एकतर हृदयाचा ठोका चुकवणारे असतात. नाही तर पोटधरुन हसवणारे. सध्या एक धोकादायक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही पोटात गोळा येईल. या व्हिडीओत एका आईने हुशारी दाखवत स्वत:सह आपल्या 4 मुलांचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ कंबोडियातील असल्याचं सांगितलं जातं. इथे एक आई तिच्या घराचे छत कोसळण्याच्या काही सेकंद आधी आपल्या मुलाला वाचवताना दिसत आहे. फॉक्स न्यूजनुसार, राजधानी नोम पेन्हमध्ये 3 जुलै रोजी ही घटना घडली. व्हिडीओची सुरुवातीला एक आई आपल्या एका मुलाला कमरेवर आणि दुसऱ्या दोन मुलांचा हात धरुन तेथून पळून जात असते. तेव्हा तिला आठवतं की तिचं आणखी एक बाळ बेबी वॉकरमध्ये मागे राहिलं आहे. तेव्हा ती पुन्हा मागे येते आणि वेळेवर त्या बाळाला घेऊन मागे हटते. त्याच्या पुढच्याच सेकंदाला वरुन छत खाली पडतो. परंतू यामध्ये मनुष्यहानी झालेली नाही. आईने फॉक्स न्यूजने घेतलेल्या इंटरव्हू मध्ये आईने सांगितले, “जर त्याच्यावर छप्पर पडले असते तर त्याचा मृत्यू झाला असता. म्हणून मी धावत जाऊन त्याला पकडले.”
The #ceiling of a residence in Phnom Penh, #Cambodia, #collapsed in the living room. Luckily, the #mother inside the house acted quickly, picking up one child with one hand and holding a school bicycle having another child with the other. All her children were saved in the end. pic.twitter.com/aK9wXVsTvW
— HKeye (@Warm_Talking) July 18, 2023
एका बिल्डरने या घटनेबद्दल सांगितले की, “घरात वॉटरप्रूफिंग नव्हते. त्यामुळे पावसामुळे छप्पर कमकुवत झाले आहे. हे खराब बांधकामामुळे झाले आहे.” बिल्डर म्हणाला, “लोकांनी घर घेताना त्याची जाणीव ठेवली पाहिजे, कारण एक दिवस ते कोसळू शकते, जसे इथे घडले.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहे. अनेकांनी हे दृश्य फारच धक्कादायक असल्याचे सांगितले आहे.