सामान्यपणे डोळे बंद केले, हृदयाची धडधड थांबली की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं आपण म्हणतो. पण तुम्हाला माहिती आहे का? खरंतर मृत्यूनंतरही मृतदेह जिवंत असतो. मृतदेहातही जीव असतो. मृत्यूनंतर एकएक अवयव काम करणं बंद करतो. (फोटो सौजन्य - Canva)
2/ 9
सर्वात आधी श्वास प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यानंतर हृदय धडकणं बंद होतं. पुढील पाच मिनिटांत शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो आणि पेशी मृत होऊ लागतात. या स्थितीला प्वाइंट ऑफ नो रिटर्न म्हणतात. यानंतर शरीराचं तापमान ताशी 1.5 डिग्री कमी होत जातं. (फोटो सौजन्य - Canva)
3/ 9
काही पेशी मृत झाल्या तरी कार्य करतात. मृत्यूनंतर त्वचा 24 तासांपेक्षा जास्त वेळ जिवंत असते. केस आणि नखांचीही वाढ होत असते. (फोटो सौजन्य - Canva)
4/ 9
मृत्यूनंतरही शरारीतील किडनी, लिव्हर आणि हृदय असे अवयव 6 तास जिवंत असतात. या कालावधीत हे अवयव दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात. (फोटो सौजन्य - Canva)
5/ 9
शरीरातील पचनक्रियाही सुरू असते. अमिनो अॅसिडमुळे शरारीतून दुर्गंधीही येऊ शकते. त्यामुळेच मृतदेहाचं नाक आणि तोंडात कापूस टाकला जातो. (फोटो सौजन्य - Canva)
6/ 9
मृत्यूनंतर काही वेळाने मृत व्यक्तीचं शरीर ओलं झालेलं असतं. कारण मूत्राशय रिकामी करण्याची प्रक्रिया सुरूच असते. मृतदेहातून मूत्रविसर्जन होतं. (फोटो सौजन्य - Shutterstock)
7/ 9
संशोधनानुसार मृत्यूनंतर आपले जिन्स जिंवत राहतात. डीएनएम मृत्यूनंतर जास्त अॅक्टिव्ह असतात. अधिक प्रमाणात प्रोटिन्स निर्मिती करतात. (फोटो सौजन्य - Shutterstock)
8/ 9
हृदय धडकणं, श्वास बंद झाला तरी मेंदू सक्रिय असतो. त्यामुळे काही लोक आपण पुन्हा जिवंत असल्याचा दावा करत आपला अनुभव सांगतात. (फोटो सौजन्य - Shutterstock)
9/ 9
येल युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार मृत्यूनंतरही नर्व्हस सिस्टमही आपलं काम बंद करायला बराच वेळ घेतो. त्यामुळेच शरीरात काही ना काही हालचाली दिसतात. मांसपेशी जखडतात पण जिवंत असल्यासारख्या हरकती होतात.