नवी दिल्ली, 8 मार्च : आजकाल काहीतरी हटके, विचित्र आणि साहसी करण्याकडे अनेकांचा कल निर्माण होत चालला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अशा व्हिडीओंचा वापर केला जातो. नेटकरीही अशा व्हिडीओंना चांगला प्रतिसाद देतात. मात्र कधी कधी साहसी, धाडसी स्टंट करण्याच्या नादात अनेकांना त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. स्टंट करणं त्यांना खूप महागात पडतं. अनेकवेळा स्टंट करताना फजिती झाल्याचे फोटो, व्हिडीओदेखील समोर येतात. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एका तरुण तरुणीला पॅराग्लायडिंग करणं महागात पडलं आहे. यामुळे त्यांचा जीवदेखील धोक्यात पडल्याचं दिसून आलं. याचा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला.
#WATCH | Kerala: A man and woman met with an accident while paragliding when they got stuck on a high mast light pole in Varkala in rural Thiruvananthapuram. Both the tourists were rescued & were shifted to the hospital. pic.twitter.com/nQVH5yZuMz
— ANI (@ANI) March 7, 2023
व्हिडीओमध्ये दिसत आहे, पॅराग्लायडिंग करताना एक तरुण तरुणी भल्यामोठ्या खांबाला अडकले आहेत. हा व्हिडीओ एनआयएने शेअर केला आहे. एनआयच्या ट्विटनुसार हा व्हिडीओ केरळमधील तिरुवनंतरपुरममधील आहे. ज्यामध्ये एक तरुण आणि एक तरुणी पॅराग्लायडिंग दरम्यान हाय मास्ट लाईटच्या खांबावर अडकलेले दिसतात. पॅराग्लायडिंग दरम्यान हे दोघेही क्रॅश होऊन लाईटच्या खांबाला धडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही पर्यटकांचा जीव वाचला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओवर खूप कमेंटदेखील येत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिलं, ‘नशीबाने वाचले, आता आयुष्यात काहीच तुफानी करणार नाही.’