मुंबई, 06 डिसेंबर: ड्रग प्रकरणानंतर दीपिका पादुकोन (Deepika Padukone) आता तिच्या नव्या फिल्ममुळे चर्चेत आहे. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी सिनेमामध्ये एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन शकुन बत्रांनी केलं आहे. या सिनेमामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिकासोबतच अनन्या पांडेदेखील झळकणार आहे. दीपिकाने या फिल्मचा एका फोटो शेअर केला आहे. दीपिकाच्या नव्या फिल्मचं नाव गुलदस्त्यात असलं तरी तिने शेअर केलेल्या फोटोमधून तिने सिनेमाच्या नावाची हिंट दिली आहे का ? असा प्रश्न चाहत्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. ज्यात समुद्र दिसत आहे. आणि तिने लिहीलं आहे की, “ONLY LOVE #project70” ओन्ली लव्ह या शब्दांना बोल्ड केल्यामुळे सिनेमाचं नाव ओन्ली लव्ह आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. या चित्रपटाध्ये लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. तसंच या सिनेमामध्ये धैर्य कारवाही झळकणार आहे.
दीपिका आणि सिद्धांतचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये दीपिका आणि सिद्धांत एका बोटीत बसलेले दिसत होते. या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी अनेक लाइक्स आणि प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर एका नेटकऱ्याने कॉमेंट केली होती की, माझं दीपिकावर प्रेम जडलं आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दीपिका आणि सिद्धांत शूट करत असलेल्या या फिल्मचं एक शेड्यूल गोव्यामध्ये पार पडलं आहे. आता मुंबई आणि अलिबागला पुढचं शूटिंग होणार आहे.

)







