मराठी बातम्या /बातम्या /Viral /धावत्या ट्रेनच्या दारातून चिमुकली अचानक पडली खाली; पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान

धावत्या ट्रेनच्या दारातून चिमुकली अचानक पडली खाली; पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलेला पराक्रम जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलेला पराक्रम जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलेला पराक्रम जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

प्रयागराज (उत्तर प्रदेश), 22 जून :  देव तारी त्याला कोण मारी... ही म्हण आपल्याला माहितीच आहे. अनेक घटनांमध्ये या म्हणीचा प्रत्ययही आपल्याला येतो. सोमवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) इथेही अशीच एक ही घटना घडली. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आईनं केलेला पराक्रम (Mother love for child) जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

या घटनेत एका मुलीच्या आईने चेन पुलिंग (Chain Pulling) करुन धावती ट्रेन थांबवली आणि ती सुमारे 3 किलोमीटर आपल्या मुलीसाठी अनवाणी धावत गेली. आपली मुलगी सुखरुप आहे, हे पाहिल्यानंतर आईच्या जीवात जीव आला. विशेष म्हणजे धावत्या ट्रेनमधून पडूनही मुलीला फारशी दुखापत झाली नाही.

झटका बसला अन ट्रेनच्या बाहेर पडली

माणिकपूरमधील (Manikpur)  इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या मायादेवी यांना त्यांच्या पतीने मारहाण करुन घराबाहेर काढले. त्या ट्रेनमध्ये स्वच्छता करुन लोकांकडे पैसे मागत आपलं पोट भरतात. त्यांना 2 वर्षांची मीनाक्षी नावाची मुलगी आहे. तिच्यासोबत मायादेवी राहतात. सोमवारी मायादेवी आपल्या मुलीसह माणिकपूर स्टेशनवरील गोदान एक्सप्रेसमध्ये झाडू मारण्यासाठी चढल्या. मीनाक्षी आपल्या आईचा पदर पकडून ट्रेनच्या दरवाज्यात उभी होती. परंतु, ट्रेन जसरा येथून पुढे मानकवार गावाजवळ येताच झटका बसल्याने मीनाक्षी दरवाज्यातून खाली पडली.

आपली मुलगी खाली पडल्याने मायादेवी जोरजोरात ओरडू लागल्या. यामुळे बोगीत एकदम खळबळ उडाली. ट्रेन (Train) वेगात असल्याने नेमकं काय करावं हे कोणालाच सुचत नव्हतं. तेवढ्यात चेन पुलिंग करा असे कुणीतरी सुचवलं. धावत जाऊन मायादेवी यांनी चेन पुलिंग करण्याचा प्रयत्न केला. ट्रेनमधील काही विक्रेत्यांनी मायादेवी यांना मदत केली. चेन पुलिंग करताच ट्रेन थांबत थांबत 3 किलोमीटर दूर इरादतगंज रेल्वे स्टेशनवर (Railway Station) पोहोचली. ट्रेन थांबताच मायादेवी अनवाणी पायांनी रुळावर धावत सुटल्या.

हे वाचा - धक्कादायक! लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा

दम लागला पण धावणं थांबलं नाही

आपल्या मुलीला वाचवण्यासाठी रुळावरुन धावत असलेल्या मायादेवींना खूप दम लागला होता, परंतु त्यांचं धावणं थांबलं नाही. त्यांची नजर केवळ मुलीला शोधत होती. धावताना त्यांना जखमा झाल्या परंतु, त्यांचे त्याकडे लक्ष नव्हते. आपली मुलगी नेमकी किती दूरवर पडली आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. अंदाज घेत मायादेवी केवळ धावतच राहिल्या. रुळावर दोनवेळा दगडाची ठेच लागून त्या पडल्या, परंतु, त्यांचं धावणं थांबलं नाही. पायातून रक्त वाहत असतानाही त्यांचा वेग कुठेच कमी नव्हता. तिथे पोहोचताना त्या दम लागल्याने अस्वस्थ झाल्या होत्या. मायादेवी यांना चिंतेत धावताना पाहून अनेकजण त्यांना तुम्ही का धावताय असा प्रश्न विचारत होते. प्रचंड दम लागलेला असतानाही मायादेवी प्रत्येकाला साहेब, काही वेळापूर्वी माझी मुलगी धावत्या ट्रेनमधून पडली असे सांगत होत्या. त्यानंतर ती तुमची मुलगी होती का, असे लोक म्हणाले. त्यावर ती कशी आहे, कुठे आहे, ती जिवंत आहे ना असे प्रश्न मायादेवी लोकांना विचारत होत्या. त्यावर एका ज्येष्ठ नागरिकाने घाबरु नका तुमची मुली जिवंत आहे असे सांगितले. ती केवळ जखमी झाली आहे. तिला डॉक्टरांकडे नेलं आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत, असे त्या नागरिकाने मायादेवींना सांगितले.

दुसऱ्या आईने वाचवले प्राण

ज्या ठिकाणी ट्रेनमधून मीनाक्षी पडली, त्या ठिकाणी मानकवार गावातील आरती पटेल उपस्थित होत्या. मुलगी रुळांवर पडलेली पाहून त्या तातडीने तिच्याजवळ गेल्या. त्यांनी मीनाक्षीला उचलून उपचारांसाठी घरी नेले. मीनाक्षीच्या डोक्यातून रक्त येत होते, आणि ती बेशुध्द (Unconscious) झाली होती. आरती यांनी एका आईप्रमाणे मीनाक्षीची काळजी घेतली. माजी सरपंचांच्या मदतीने त्या मीनाक्षीला दवाखान्यात घेऊन गेल्या आणि तिच्यावर इलाज केले. यावेळी इंजेक्शन देताच मीनाक्षी शुध्दीवर आली.

रेल्वे रुळांनजीक गवत उगवल्याने वाचले प्राण

ज्या वेगात ट्रेन धावत होती, तो पाहता मीनाक्षीचे प्राण वाचणे कठीण होते. आरती यांनी सांगितले की पावसामुळे रेल्वे रुळांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. ही मुलगी या गवतात पडली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली नाही. मुलीला डोक्यावर किरकोळ दुखापत झाली. मात्र ती खूप घाबरली होती. परिसरातील ग्रामस्थांनी मायादेवी आणि मीनाक्षीला जेवण दिले आणि अर्थिक मदतही केली.

First published:
top videos

    Tags: Railway accident, Train, Uttar pardesh