लंडन, 12 एप्रिल : प्रत्येक आईचा जीव तिच्या मुलांमध्ये अडकलेला असतो. मूल म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा. पण एक आई आपल्या अशाच काळजाच्या तुकड्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहेत. पोटचा मुलगा जिवंत असताना त्याची अंत्यसंस्काराची तयारी ही आई करत आहे. तिच्यावर अशी वेळ ओढावली, याचं कारणही काळीज पिळवटून टाकणारं आहे. ब्रिटनमधील 28 वर्षीय जेड जोन्स. जिचा मुलगा लुई जन्माच्या आठ आठवड्यानंतरच आजारी पडला.जेड म्हणाली, जेव्हा लुई तीन आठवड्यांचा होता तेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात न्यावं लागलं. डॉक्टरांनी त्याला ब्राँकायटिस असल्याचं सांगितलं. त्याच्या नाकात औषधाचे थेंब टाकून घरी पाठवलं. पण लुईची तब्येत चार दिवसांनी खालावली. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं.
वैद्यकीय तपासणीत त्याच्या हृदयात छिद्र असल्याचं निदान झालं. लुईस एन्टरोव्हायरसशी झुंज देत होता. यामुळे त्याच्या हृदयाला गंभीर इजा झाली. अनेकदा त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला LVAD (यांत्रिक हृदय) सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. परंतु हे तात्पुरतं आहे. पण हृदय प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हा तर चमत्कार!130 वर्षांनी जन्माला आलं असं बाळ; पाहताच सर्वांना आश्चर्याचा धक्का हृदय प्रत्यारोपण म्हणजे एका मानवी शरीरातील हृदय दुसऱ्या मानवी शरीरात प्रत्यारोपित करणं. ब्रेनडेड म्हणून मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या शरीरातील हृदय विशिष्ट वेळेपर्यंत कार्य करत असतं. हे हृदय दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करून त्या रुग्णाचा जीव वाचवता येतो. पण लुईला असं हृदय देणारा अवयवदाता अद्याप सापडलेला नाही. लुई अजून हृदयाच्या प्रतीक्षेत आहे. जेडही पूर्णपणे कोलमडली आहे.जेडी या अवयवदात्याचा शोध घेते आहे. म्हणूनच तिने आपल्या मुलाची ही स्टोरी शेअर केली आहे, जेणेकरून लवकरात लवकर अवयवदाता मिळेल. वेळीच हृदय प्रत्यारोपण झालं नाही तर तो जगू शकणार नाही. तिचा मुलगा तिच्या डोळ्यासमोर जीवनमृत्यूशी झुंज देतो आहे. कोणत्याही आईला आपल्या मुलाला आपल्या डोळ्यासमोर असं मरताना पाहणं यापेक्षा दुसरा कठीण क्षण कोणताच नाही. आश्चर्य! गेली 15 वर्षे प्रेग्नंट आहे महिला, एक-दोन नव्हे तर तब्बल 12 मुलं; कारणही विचित्र मिररच्या वृत्तानुसार जड अंत:करणाने ती म्हणाली, लुई जिवंत आहे तरीही मी हृदयावर दगड ठेवून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहे.