वॉशिंग्टन, 02 एप्रिल : अमेरिकेतल्या (America) 50 वर्षांची अॅलिस स्मिथ (Alice Smith) ही महिला सध्या प्रेग्नंट (Pregnant) आहे. मे महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणजे तिच्या गर्भात तिची मुलगी आणि जावायाचं मूल वाढत आहे. हे ऐकायला काहीसं विचित्र वाटत असलं तरी वैद्यकिय शास्त्रातील (Medical Science) प्रगत तंत्रज्ञानामुळं ही गोष्ट साध्य झाली आहे.
गेल्या काही वर्षात वैद्यकीय शास्त्रानं मोठी प्रगती केली आहे. पूर्वी जर एखाद्या महिलेची नैसर्गिकरित्या गर्भधारणा (Pregnancy) होत नसेल तर संबंधित दांपत्याला मूल दत्तक (Adopt) घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता वैद्यक शास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वाची (Infertility) समस्या असलेलं जोडपं देखील स्वतःच्या बाळाला जन्म देऊ शकतं. उटाहमध्ये राहणारी 50 वर्षाची अॅलिस ही महिला आपल्या मुलीला मातृत्वाचा आनंद देण्यासाठी या तंत्राची मदत घेत आहे. अॅलिस तिची 24 वर्षाची मुलगी कॅटलीनसाठी सरोगेट मदर (Surrogate) बनली आहे. अॅलिसला आठ अपत्य (Children) आहेत.
हे वाचा - लग्न म्हणजे काय? महिलेच्या ट्विटनंतर सुरू झाला वाद; पाहा भन्नाट प्रतिक्रिया
कॅटलीनला स्जोग्रेन (Sjogren) नावाचा आजार आहे. 2019 मध्ये तिला स्जोग्रेन हा आजार झाला. हा आजार असलेल्या महिला आई होण्यासाठी सक्षम नसतात. तथापि, ही समस्या निर्माण होण्यापूर्वी कॅटलिनला एक मुलगा झालेला आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या बाळासाठी कॅटलिनने तिच्या आईची मदत घेतली आहे. अॅलिस आयव्हीएफच्या (IVF) माध्यमातून तिची मुलगी आणि जावयाच्या बाळाची आई होणार असून, ती सध्या प्रेग्नंट आहे. अॅलिस मे महिन्यात बाळाला जन्म देईल.
हे वाचा - दुसऱ्या महिलेच्या प्रेमात वेडा होऊन नवऱ्याने सोडलं; बायकोने घेतला खतरनाक बदला
सासूनं सरोगेट बनण्याचा निर्णय घेतल्यानं कॅटलीनाचा नवरा खूश आहे. हे दांपत्य अॅलिसची खूप काळजी घेत आहेत. अॅलिस उटाहमध्ये शेती करते. परंतु, आपल्या मुलीच्या आनंदासाठी तिनं वयाच्या 50 व्या वर्षी प्रेग्नंट होण्याचा निर्णय घेतला. आपलं कुटुंब मोठं असावं, असं कॅटलीनाला नेहमी वाटत असे. पण या आजारामुळे पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ती पुन्हा प्रेग्नंट राहू शकत नव्हती. परंतु आता ती आपल्या आईच्या मदतीनं कुटुंबविस्तार करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.