उत्तर प्रदेश, 6 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हरदोई जिल्ह्यातील कचहरी परिसरात भररस्त्यात सासू आणि जावयामधील वाद पाहायला मिळाला. यावेळी सासूने जावयाची चपलांनी मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. यानंतर तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी सासऱच्यांविरोधात घरेलू हिंसाचार प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यादरम्यान तरुण वैयक्तिक कामासाठी कचहरी येथे आला होता. त्यावेळी त्याचा सामना सासूसोबत झाला. यानंतर सासू भलतीच चिडली आणि जावयाला मारहाण करू लागली. यावेळी तरुण स्वत:ला वाचविण्यासाठी आरडाओरडा करू लागला. मात्र संतापलेल्या सासूने त्याचं ऐकलं नाही आणि ती त्याला चपलांनी मारहाण करीतच होती. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तरुणाने या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Beaten by mother-in-law)
हे ही वाचा- VIDEO: मोबाइलवर बोलत असल्याने अंदाज चुकला; कारच्या धडकेत हवेत उडाली व्यक्ती पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचं एक महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. यानंतर तरुणी आपल्या माहेरी निघून आली. यानंतर तरुणाच्या पत्नीने त्याच्याविरोधात घरेलू हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार तरुण कलेक्टर ऑफिसमध्ये काही कामासाठी आला होता. यावेळी बाजारात त्याची सासू भेटली. आपल्या मुलीला मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर महिला संतापली होती. तिने चप्पल काढली आणि भरचौकात जावयाला मारहाण सुरू केली. यावेळी बाजारात आलेल्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला. आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडित चांद बाबू याने या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं की ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

)







