जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मालकाने टक लावून पाहताच श्वानाने...; VIDEO मध्येच पाहा नेमकं काय घडलं?

मालकाने टक लावून पाहताच श्वानाने...; VIDEO मध्येच पाहा नेमकं काय घडलं?

मालकाने टक लावून पाहताच श्वानाने...; VIDEO मध्येच पाहा नेमकं काय घडलं?

मालक खात असताना श्वानाने जे केलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • -MIN READ Trending Desk Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

    मुंबई, 23 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज भरपूर व्हिडिओ शेअर होत असतात. या व्हिडिओजपैकी विनोदी व्हिडिओज लोकांना खूप आवडतात. प्राण्यांच्या गमतीशीर व्हिडिओजनाही विशेष प्रेक्षकवर्ग असतो. कुत्र्यांचे त्यांच्या मालकांसोबतचे व्हिडिओ खूप जणांना आवडतात. कुत्र्यांचं मालकांसोबतचं बाँडिंग (Dog Bonding With Human) पाहायला सर्वांना आवडतं. एक कुत्रा आणि त्याच्या मालकाचा व्हिडिओ सध्या असाच सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. लाफ्स फॉर ऑल (Laughs 4 All) या ट्विटर (Twitter) अकाउंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. त्यातल्या कुत्र्याच्या करामतीने सर्वांचं भरपूर मनोरंजन केलंय. त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुत्र्यांच्या करामतींचे अनेक व्हिडिओज आजवर व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओजमध्ये मालक कुत्र्यासोबत मस्ती करतो, तर काही व्हिडिओजमध्ये कुत्रा गमती करतो. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधला कुत्रा फारच नाटकी आहे. या व्हिडिओला भरपूर लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओत एक कुत्रा आपल्या मालकाच्या शेजारी बसलेला दिसतो. मालक त्याच्या समोर असलेल्या ताटातून काही खातो आहे. हे वाचा -  VIDEO - आधी निमूटपणे मार खाल्ला नंतर घेतला खतरनाक बदला; छळणाऱ्या तरुणाला गाढवाने दिली भयानक शिक्षा व्हिडिओमधला गमतीचा भाग कुत्र्याचा आहे. मालक खात असताना तो कुत्रा एकटक मालकाच्या हातातल्या किंवा ताटातल्या पदार्थांकडे पाहतो. जोवर मालकाचं लक्ष जात नाही, तोपर्यंत कुत्रा तसाच रोखून पाहत राहतो; पण जेव्हा मालकाचं त्याच्याकडे लक्ष जातं, तेव्हा तो तोंड फिरवतो. मालकाच्या खाण्याशी आपल्याला काही देणं-घेणं नाही, असं तो दाखवतो. मालक पुन्हा खाऊ लागल्यावर कुत्रा पुन्हा त्याच्याकडे पाहू लागतो.

    जाहिरात

    लोकांनी या व्हिडिओला डोक्यावर घेतलंय. ट्विटरवरच्या Laughs 4 All या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की ‘शप्पथ, हा कुत्रा त्या माणसाच्या खाण्याकडे पाहत नाहीये!’ आतापर्यंत या व्हिडिओला 34 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युझर्सनी तो व्हिडिओ रीट्वीटही केला आहे. व्हिडिओमधल्या कुत्र्याच्या चेहऱ्यावरचे भाव युझर्सना खूप आवडत आहेत. त्यांचं मनोरंजन करत आहेत. हे वाचा -  Girl child kissing snake : Shocking! खतरनाक सापाला किस करायला गेली चिमुकली आणि…; अंगावर काटा आणणारा VIDEO कुत्रे, मांजरी अशा प्राण्यांच्या व्हिडिओजना सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्धी मिळते. लोकांना प्राण्यांच्या भावना व त्यांचं माणसांसोबत असलेलं नातं पाहायला खूप आवडतं. पाळीव प्राण्यांमध्ये अनेकवेळा कुत्र्यांनाच पसंती दिली जाते. कारण कुत्रे इमानदार, लाघवी असतात. घरातल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणेच त्यांचं संगोपन केलं जातं. त्यामुळे कुत्र्यांचे किंवा कुत्र्याच्या पिलांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. त्यांना लाइक्सही भरपूर मिळतात. आताचा व्हिडिओही त्याचंच एक उदाहरण आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात