जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! मोसंबी ज्युसमुळे Dengue रुग्णाचा मृत्यू; नेमकं काय झालं पाहा VIDEO

Shocking! मोसंबी ज्युसमुळे Dengue रुग्णाचा मृत्यू; नेमकं काय झालं पाहा VIDEO

प्रतीकात्मक फोटो/ सौजन्य - Canva

प्रतीकात्मक फोटो/ सौजन्य - Canva

मोसंबी ज्युसमुळे डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 20 ऑक्टोबर : सध्या देशातील बऱ्याच भागात डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसते आहे. डेंग्यू हा जीवघेणा आजार. वेळीच उपचार झाले नाही तर डेंग्यूमुळे रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. पण सध्या एक असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्यात मोसंबी ज्युसमुळे डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात. उत्तर प्रदेशच्या प्रयागरराजमधील ही धक्कादायक घटना आहे. इथं एका डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मोसंबी ज्युसमुळे या रुग्णाचा जीव गेला असा आरोप या मृत रुग्णाच्या कुटुंबाने केला आहे. आता डेंग्यू आणि मोसंबी ज्युस याचा संबंध काय, मोसंबी ज्युसमुळे डेंग्यू रुग्णाचा मृत्यू कसा होऊ शकतो, मोसंबी ज्युस डेंग्यू रुग्णांसाठी घातक आहे का? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडीओत मिळेल. हे वाचा -  VIDEO - रस्त्यात समोर होता मृत्यू! यमराजाआधी देवदूत बनून आला पोलीस; वाचवला शेतकऱ्याचा जीव डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होतं. कित्येक रुग्णांना प्लाझ्मा चढवण्याची गरज पडते. या रुग्णाला प्लाझ्माची गरज होती. त्याला प्लाझ्मा देण्यात आला. पण प्रत्यक्षात तो प्लाझ्मा नव्हे तर मोसंबी ज्युस होता, असा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. त्यामुळेच या रुग्णाचा मृत्यू झाला असा दावा केला जातो आहे.

जाहिरात

एका स्थानिक पत्रकाराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओत तो नकली प्लाझ्मा दाखवताना दिसतो आहे. जो प्लाझ्मा नसून मोसंबी ज्युस असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान बोगस प्लाझ्मा प्रकरणी तपास समिती गठीत करण्यात आली आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी बोगस ब्लड बँकेचा पर्दाफाश झाला होता. पण हा मोसंबी ज्युस आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती प्रयागराजचे आयजी राकेश सिंह यांनी दिली.

जाहिरात

तर याप्रकरणी तपास सुरू असून  या प्रकरणात दोषी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,  असं आश्वासन उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात