• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • राक्षसी मुळा! महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्यानं केलेला चमत्कार पहायला होते आहे गर्दी

राक्षसी मुळा! महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्यानं केलेला चमत्कार पहायला होते आहे गर्दी

हा मुळा इतर मुळ्यांसोबतच उगवला. मात्र तो आहे अजब.

 • Share this:
  लोणार, 22 मार्च : मुळा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मुळा सॅलड म्हणून, भाजी आणि कोशिंबिरीतही वापरतात. आपल्याला मुळ्याचा आकार माहीत असतो. या मुळ्याला पाहून मात्र तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. (Buldhana news) तुम्ही कधी 9 किलोचा मुळा पाहिला आहे का? असा मुळा एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकवला आहे. विशेष म्हणजे, हा प्रयोग एका महाराष्ट्रातील शेतकऱ्यानं केला आहे. लोक आता या मुळ्याला राक्षसी मुळा म्हणत आहेत. (reddish worth 9 kg) ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येणाऱ्या एका लहानशा गावाची. या गावाचं नाव आहे गोत्रा. या गोत्रा गावात गवान रामनाथ मुंडे राहतात. हे मुंडे आपल्या शेतात विविध भाज्या पिकवत असतात. यावेळी नेहमीप्रमाणं त्यांनी मुळ्याचं पीक घेतलं होतं. (Buldhana farmer grows monster reddish) हेही वाचा 'आपले साहेब मुख्यमंत्री होणार' सेनेच्या नेत्याने उदयनराजेंना मारली मिठी, VIDEO मुंडे यांनी सांगितलं, की त्यांनी या मुळ्याच्या पिकाला चांगल्या पद्धतीनं खत आणि पाणी दिलं. मुळ्याचं पीक तयार झालं. त्यांनी ते काढायला सुरवात केली. एका मुळ्याला काढताना त्यांना खूप कष्ट घ्यावं लागलं. (monster radish Maharashtra news) मुंडे यांच्या सांगण्यानुसार, मुळा जसा बाहेर आला, तसं त्याला पाहून तिथं असलेले शेतकरी आणि मजूर सगळेच थक्क झाले. बाहेर निघालेल्या मुळ्याचा आकार पाहून कुणाचाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. (huge radish in gawan munde farm) हेही वाचा खाद्यतेलाचा टँकर पलटी होताच तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, Video Viral मुंडे यांनी सांगितलं, की या मुळ्याचं वजन 9 किलोच्या आसपास आहे. या राक्षसी मुळ्याबाबत आसपासच्या गावांमध्येही बातमी कळाली. याला पाहण्यासाठी आता लोकांची रांग लागली आहे. अनेक लोकांसाठी हा मुळा आकर्षणाचं केंद्र बनला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: