जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका सेकंदात मुंगसानं मृत्यूला दिली मात; थरारक VIDEO VIRAL

एका सेकंदात मुंगसानं मृत्यूला दिली मात; थरारक VIDEO VIRAL

एका सेकंदात मुंगसानं मृत्यूला दिली मात; थरारक VIDEO VIRAL

कोब्रा आणि मरण यांना एका सेकंदात मुंगसाने दिली मात, पाहा हा विलक्षण VIDEO

  • -MIN READ
  • Last Updated :

    जंगलात एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो, हा निसर्गाचा नियम आहे. यात कधीकधी रोमांचक अनुभव पाहायला मिळतात. असे असले तरी जंगलात अगदी चालाकीनं शिकार करण्यासाठी कोब्र्याची ओळख आहे. सोशल मीडियावर सध्या एक स्लो मोशल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंगस आणि कोब्रा यांच्यातील भांडण दिसत आहे. मुंगस हा एकमेव प्राणी आहे जो सापाला पळवून लावू शकतो. सापांप्रमाणेच मुंगसाच्या संवेदी चेतातंतूंच्या टोकामधे फेरफार असतो, त्यामुळे त्यांना सापाच्या विषाविरुद्ध प्रतिकारक्षमता असते. शिवाय जाड कातडे व चपळता देखील त्यांना विषाविरुद्ध मदत करते. त्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी नाग व इतर विषारी सापांविरुद्ध संरक्षणासाठी मुंगसं पाळली जातात. असाच एक कोब्राला टक्कर देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदान ट्विटरवर शेअर केला आहे. वाचा- डोळ्यांच्या पापण्या उघडण्याआधीच अजगरानं केली हरणाची शिकार, पाहा थरारक VIDEO सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना, “जीव वाचवण्याची एक शानदार कला. कोब्रा आणि मरण यांना एका सेकंदात मात दिली. मुंगसानं जीव वाचवण्यासाठी जे काय केलं ते कौतुक करण्यासारखं आहे. हवेत उडी मारत मुंगसानं आपला जीव वाचवला”, असे कॅप्शन लिहिले आहे.

    जाहिरात

    **वाचा-** आयडियाची कल्पना! रस्ता क्रॉस करण्यासाठी हत्तीचा अजब जुगाड, VIDEO VIRAL या व्हायरल व्हिडीओमध्ये कोब्रा मुंगसावर हल्ला करताना दिसत आहे. मात्र कोब्रा जवळ येण्याआधीच आपला जीव वाचवण्यासाठी मुंगसानं हवेत उडी घेतली, एका सेकंदात त्यानं आपला जीव वाचवला. ट्विटरवर मुंगसाच्या या कौशल्याचे कौतुक केले जात आहे. हा व्हिडीओ 25 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 3 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 200हून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. वाचा- अचानक घरात घुसला बिबट्या आणि कपाटावर चढून बसला; नगरजवळच्या घटनेचा थरार याआधी सापानं काही सेकंदात हरिणाची शिकार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर, काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारची आणखी एक घटना समोर आली होती. अजगर झाडाच्या पाठी लपला होता, बिबट्या जवळ येताच अजगराने बिबट्यावर हल्ला केला होता. काही वेळ सुरु असलेल्या झटापटीनंतर बिबट्याने अजगरावर मात करत त्यालाच भक्ष्य केलं होतं. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात