निकोलचा व्हिडिओही एका यूजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिला टॅग केले आहे. सोशल मीडिया बनावट असू शकतो याचा हा पुरावा असल्याचे निकोलने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. व्हिडिओमध्ये निकोलचा पहिला फोटो दिसत आहे ज्यामध्ये तिने चांगला मेकअप केला आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. पण तिच्या एका फोटोत ती अगदी साध्या पद्धतीने, मेकअपशिवाय दिसत आहे. अशाप्रकारे, ती सांगते की फेसअॅप नावाच्या अॅपद्वारे तिने तिच्या फोटोवर मेकअप केला आणि चेहऱ्याचा आकार देखील बदलला, तर सोशल मीडियावर लोकांना वाटते की ती प्रत्यक्षात तशीच आहे. निकोलचा हा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला असून युजर्स संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. अनेक युजर्सनी तिच्या या खरेपणाबद्दल तिचे कौतुक केले आहे. इतकी सुंदर आहे की तिला कोणत्याही प्रकारच्या फिल्टरची गरज नाही. असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने कधीही इन्स्टाग्राम मॉडेल्सवर विश्वास ठेवणार नाही. अशा अॅप्सवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Social media, Viral news