उटावा, 03 फेब्रुवारी : सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही. आता तर त्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. अगदी मेकअपपासून ते कॉस्मेटिक सर्जरीपर्यंत. काही लोक सुंदर दिसण्यासाठी काहीही करायला तयार होतात. सुंदर दिसण्याची अशीच एक हौस एका मॉडेलला भारी पडली आहे. तिने असं काही केलं की त्यामुळे तिचा एक ब्रेस्टच फुटला आहे. फॅशनच्या नादात तिची भयंकर अवस्था झाली आहे.
कॅनडात राहणारी मॉडेल मॅरी मॅग्डलीन. 30 वर्षांची आहे. सुंदर दिसण्यासाठी तिने बऱ्याच सर्जरी केल्या आहेत. तिने सांगितल्यानुसार 21 वर्षांची असताना तिने पहिली सर्जरी केली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत तिने खूप सर्जरी केल्या. सर्जरीवरच एक लाख डॉलर म्हणजे तब्बल 81 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार मॅरीने 10 किलो वजनाचं ब्रेस्ट इम्प्लांट केलं होतं. त्यापैकी एक ब्रेस्ट तिचं अनाक फुटलं. आता ती एखाद्या एलियनसारखी दिसते आहे.
हे वाचा - Breast surgery नंतर महिलेला झाला जीवघेणा आजार; आता उपचार करणंही अशक्य
तिनं फक्त ब्रेस्ट इम्प्लांटच नाही तर ओठांचीही सर्जरी केली आहे. बार्बी डॉलसारखं नाक हवं म्हणून नाकाची सर्डरी केली. कॅट आय सर्जरी आणि आयब्रो इम्पांटही केलं आहे. याशिवाय तिच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहे. तिच्या या विचित्र हौशेमुळे तिला गंभीर अशी पाठदुखीची समस्याही झाली आहे. तिची अवस्था इतकी भयंकर आहे की तिला कुठे जाण्यासाठी व्हिलचेअरचीच गरज पडते.
ब्रेस्ट सर्जरीचा धोका
ब्रेस्ट एन्हेंसमेंट या शस्त्रक्रियेला ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा बूब जॉब असेही म्हणतात. यामध्ये स्तन घट्ट व मोठे करून त्याला योग्य आकार दिला जातो. ही शस्त्रक्रिया अनेक प्रकारे केली जाते. यामध्ये सिलिकॉन किंवा सलाईन ब्रेस्ट इम्प्लांट किंवा फॅट असे विविध प्रकारचे इम्प्लांट वापरले जातात. 2-3 तास लागतात आणि सुमारे 1-2 लाख रुपये खर्च येतो.
हे वाचा - 'तो' होणार आई, भारतातील पहिला ट्रान्समेल प्रेग्नंट; ट्रान्सजेंडर कपलने शेअर केले PHOTO
या सर्जरीनंतर दोन महिन्यांपर्यंत जड वजन उचलण्यास मनाई असते. याशिवाय, शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला दिला जातो. वेदना आणि संसर्ग टाळण्यासाठी काही औषधे दिली जातात. सूज आल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज असते.
या सर्जरीमुळे स्तनामध्ये गाठ होण्याचा धोका असतो. काही प्रकरणांमध्ये, ही शस्त्रक्रिया 2-3 महिन्यांत पुन्हा करावी लागते. स्तनामध्ये वेदना होऊ शकते किंवा इम्प्लांट गळती होण्याचा धोका असू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.