केरळमधील ट्रान्सजेंडर कपल जिया आणि जाहाद यांनी सोशल मीडियावरून त्यांना बाळ होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाम्पत्याने इन्स्टा पोस्टवर काही फोटोही शेअर केले आहेत. कोझीकोडमधील वैद्यकीय कॉलेजच्या डॉक्टरांच्या एका पथकाने म्हटलं की, गर्भधारणा करण्यात दाम्पत्याला कोणत्याही शारिरीक अडचणी नव्हत्या. दोघांनीही लिंग परिवर्तन केलं होतं.