जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कपड्यांशिवायच रॅम्पवर आली जगप्रसिद्ध Model Bella Hadid, शरीरावर Spray ने साकारला ड्रेस; पाहा Live video

कपड्यांशिवायच रॅम्पवर आली जगप्रसिद्ध Model Bella Hadid, शरीरावर Spray ने साकारला ड्रेस; पाहा Live video

मॉडेल बेला हदीद शरीरावर स्प्रे ड्रेस साकारताना.

मॉडेल बेला हदीद शरीरावर स्प्रे ड्रेस साकारताना.

फॅशनच्या दुनियेने एक वेगळीच हाइट गाठली आहे. बेलाने चक्क रॅम्पवरच स्प्रेपासून तयार केलेला ड्रेस घातला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

पॅरिस, 04 सप्टेंबर : विचित्र कपडे किंवा विचित्र फॅशन म्हटलं की आपल्यासमोर सर्वात आधी येते ती अभिनेत्री उर्फी जावेद. आपण विचारही करणार नाही, असे ड्रेस उर्फी घालते. पण आता उर्फीच्याही एक पाऊल पुढे गेली आहे ती जगप्रसिद्ध मॉडेल बेला हदीद. या सुपरमॉडेलच्या फॅशनचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बेलाच्या फॅशनचा असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. साबणाच्या जाहिरातीत बाथटबमध्ये साबणाच्या फेसमध्ये बसलेली मॉडेल तुम्ही पाहिली असेल. या मॉडेलप्रमाणे साबणाच्या फेसमध्ये तुम्हीही स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला असेल. पण बेला हदीदने मात्र चक्क अशाच फेसचा ड्रेस घातला आहे. आपल्याला फक्त कल्पना करूनच अशक्य वाटतं. पण हे शक्य झालं आहे. फॅशनच्या दुनियेने एक वेगळीच हाइट गाठली आहे. मॉडेल बेला हदीद कपड्यांशिवायच रॅम्पवर आली आणि तिने रॅम्पवरच स्प्रेने शरीरावर ड्रेस साकारला. हे वाचा -  आता तर हद्दच झाली! Urfi Javed ने यावेळी कपड्यांऐवजी…, पाहा NEW LOOK व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. फक्त बिकिनी घातलेली बेला दोन्ही हातांनी आपले ब्रेस्ट झाकून घेत बिनधास्तपणे रॅम्पवर येताना दिसते. रॅम्वर येतात काही लोक तिच्याजवळ स्प्रे घेऊन येतात आणि तिच्या शरीरावर स्प्रे मारू लागतात. जसा शरीरावर ड्रेस असतो, तशा पद्धतीने हा स्प्रे मारला जातो. नको असलेल्या भागावरील स्प्रे हटवला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

पाहता पाहता काय चमत्कार बेलाच्या शरीरावरील स्प्रेपासून सुंदर ड्रेस तयार झालेला दिसतो. आश्चर्य म्हणजे बेलाच्या डाव्या पायाजवळून या ड्रेसला कटही दिला जातो.

जाहिरात

शेवटी पाहिल्यानंतर हा पांढऱाशुभ्र ड्रेस स्प्रेपासून तयार झाला आहे, यावर विश्वासच बसत नाही. त्यामुळेच प्रेक्षकांसमोर हा फॅशनचा कारनामा करून दाखवण्यात आला आहे. हे वाचा -  ‘हा’ ब्रिटिश तरुण अनवाणी फिरून नेटिझन्सना विकतोय घाणेरड्या पायांचे फोटो! पॅरिश फॅशन वीकमधील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तोंडात बोटं घालायला लावेल असा हा व्हिडीओ आहे. तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात