मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

‘हा’ ब्रिटिश तरुण अनवाणी फिरून नेटिझन्सना विकतोय घाणेरड्या पायांचे फोटो!

‘हा’ ब्रिटिश तरुण अनवाणी फिरून नेटिझन्सना विकतोय घाणेरड्या पायांचे फोटो!

ब्रिटिश तरुण अनवाणी फिरून विकतोय घाणेरड्या पायांचे फोटो!

ब्रिटिश तरुण अनवाणी फिरून विकतोय घाणेरड्या पायांचे फोटो!

इंग्लंडमध्ये केंब्रिज येथे राहणार्‍या 20 वर्षांच्या जॉर्ज वुडविलेची त्याच्या विचित्रपणामुळे त्याच्या परिसरात चांगलीच चर्चा आहे. इतकंच नाही, तर सोशल मीडियावरही त्याची खूप चर्चा आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

अनेकदा लहान मुलं अनवाणी पायाने सगळ्या घरभर हिंडतात. कधी कधी तेच घाण झालेले पाय न धुताच पलंगावर चढतात, तेव्हा आई-वडील त्यांना ओरडतातत. थंडीत तर लहान मुलांच्या पायात मोजे किंवा शूज घातलेच जातात, जेणेकरून त्यांना थंडीचा त्रास होऊ नये; पण एक ब्रिटिश तरुण असा आहे जो कुठल्याच ऋतूत चपला किंवा कोणत्याही प्रकारचं पादत्राण घालत नाही. इतकंच नाही तर घराबाहेर हॉटेलमध्ये जाताना, कुणाला भेटायला जातानाही तो अनवाणीच फिरतो. हे असं करण्यामागे एक विचित्र कारण आहे. या गोष्टीचा त्या तरुणाने खुलासा केलाय.

इंग्लंडमध्ये केंब्रिज येथे राहणार्‍या 20 वर्षांच्या जॉर्ज वुडविलेची त्याच्या विचित्रपणामुळे त्याच्या परिसरात चांगलीच चर्चा आहे. इतकंच नाही, तर सोशल मीडियावरही त्याची खूप चर्चा आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जॉर्ज आपली आई आणि आजोबांसोबत प्लायमाउथ येथे फिरायला गेला. तिघंही हॉटेलमधून बाहेर फिरायला आले. त्या वेळी जॉर्जला एक कल्पना सुचली. त्याला असं वाटलं, की माणसांनी जोडे घालून फिरण्याची गरज नाही. त्याशिवायही ते सहज हिंडू-फिरू शकतात. हॉटेलवर परत आल्यावर त्याने या गोष्टीबद्दल इंटरनेटवर सर्च केलं. तेव्हा त्याला कळलं, की बेअरफूट मूव्हमेंट अगोदरपासूनच सुरू आहे. त्या मोहिमेअंतर्गत अनेक जण अनवाणी फिरत आहेत. जॉर्जने आपल्या पर्सनल इन्स्टाग्राम अकाउंटवर अशाच एका अनवाणी फिरणार्‍या तरुणीचा इंटरव्ह्यूही घेतलाय. ही तरुणी 25 वर्षं अनवाणी फिरत असल्याचं सांगतेय.

एका वर्षापासून जॉर्ज फिरतोय अनवाणी!

सुट्टीवरून परत आल्यावर जॉर्जने आपले चप्पलचे 20 जोड फेकून दिले. गेलं वर्षभर तो अनवाणीच फिरतो आहे. सुरुवातीला त्याला या गोष्टीचा त्रास झाला; पण आता तो चांगला सरावला आहे. तो म्हणतो, की अनेक जण अनवाणी फिरण्यामुळे त्याला टाळतात. एकदा तो सुपरमार्केटमध्ये फिरताना त्याला मॅनेजरनं पाहिलं. त्याने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं. अनेकदा लोकांना त्याची किळसही येते. कारण अनेकदा त्याचे पाय खूपच खराब झालेले असतात; पण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापूर्वी तो पाय धुऊन घेतो.

हेही वाचा - Coffee Day : रोज या प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात अनेक फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर

पायांच्या फोटोजची सुरू केली विक्री

थंडीच्या दिवसात त्याला अनवाणी पायांनी फिरण्याचा खूप त्रास झाला; पण काही दिवसांतच त्याला याची सवय झाली. सोशल मीडियावर त्याचे चाहते वाढायला लागले. त्यानंतर जॉर्जने ओन्ली फॅन्स या सबस्क्रिप्शन साइट प्लॅटफॉर्मवर आपलं अकाउंट सुरू केलं. या अकाउंटद्वारे तो अनवाणी चालल्यामुळे आपल्या घाणेरड्या झालेल्या पायांचे फोटो विकतो. पहिल्या महिन्यात त्याने 9 हजार रुपये कमावले; पण त्याला विश्वास आहे, की लवकरच तो लाखो रुपये कमावेल.

अनवाणी फिरणं हे शरीरासाठी उपयुक्त असल्याचं अनेक ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे तळपायांवर ताण येतो; पण विविध आजारही दूर राहतात. अ‍ॅक्युप्रेशरसारखी ट्रीटमेंट घेणार्‍यांना खडबडीत पृष्ठभाग असलेले जोडे वापरणं उपयुक्त ठरतं; पण जॉर्ज वुडविले हा तरुण जे करतोय ते नक्कीच अजब आहे.

First published:

Tags: Lifestyle