नवी दिल्ली, 18 जून : सामान्यपणे आपल्या हातातून मोबाईल पडला तो तुटला नाही तरी तो बिघडतो. किंवा मोबाईल पडून तुटला आणि त्याचे तुकडे झाले की तो सुरू होणं अशक्यच. किंबहुना मग तो भंगार होतो आणि दुसरा नवीन मोबाईल घ्यावा लागतो. पण सोशल मीडियावर मोबाईलचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात मोबाईलचे दोन तुकडे झाले तरी बटण ऑन केल्यानंतर मोबाईल सुरू झाला. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच जोर का झटका बसला आहे. दोन तुकडे झालेल्या मोबाईलला काहीच झालं नाही, तो आधीसारखाच सुरू होता. दोन तुकडे होऊनही त्यातील कनेक्शन तुटलं नाही हे पाहून आश्चर्य वाटतं आहे. त्यामुळेच मोबाईलचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. आता हे कसं काय शक्य आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग व्हिडीओ पाहुयात. चोरच तुमचा चोरलेला मोबाईल स्वतः परत आणून देईल; फक्त 45 सेकंदाचा हा VIDEO पाहा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता टचस्क्रिन नव्हे तर की-पॅड असलेला हा मोबाईल आहे. एक व्यक्ती व्हिडीओतच हा मोबाईल कापताना दिसते. एका मशीनने मोबाईलचे ती दोन तुकडे करते. मोबाईलच्या सर्वात वरील बटणांवरून ती मशीन फिरवते. मोबाईलची स्क्रिन आणि की-पॅड दोन्ही वेगळे होतात. त्यानंतर ही व्यक्ती स्क्रिनपासून वेगळ्या झालेल्या की-पॅडवरील बटण दाबते आणि काय आश्चर्य. चक्क स्क्रिन ऑन झालेला दिसतो. म्हणजे तुकडे झाले तरी की-पॅडवरील बटण दाबताच स्क्रिन सुरू होतो. आईच्या गावात अन बाराच्या भावात! तोंड-डोळे-कान-नाक असलेला ‘आंबा’; विश्वास बसत नाही तर VIDEO पाहा व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी याला जादू म्हटलं आहे तर कुणी हा व्हिडीओ एडिट केल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
funtaap नावाच्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.