मुंबई : भारतात मासिक पाळीबद्दल वेगवेगळी मान्यता आहे, काही भागात महिलांना पहिल्यांदा पाळी आल्यानंतर त्याच सण उत्सव केला जातो. तर काही ठिकाणी यासंबंधी कुप्रथा देखील पार पाडली जाते. आपल्या भारत देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध जाती धर्माचे लोक राहातात, त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चालीरीती आणि मान्यता आहेत. अशाच काही मान्यता आहेत मासिक पाळीबद्दल. आज या लेखात आम्ही तुम्हाला प्राचीन काळातील भारतातील पिरियडशी संबंधित प्रथांविषयी सांगणार आहोत.
भारतात अनेक ठिकाणी मासिक पाळीदरम्यान मुलींना अस्पृश्य घोषित केले जाते. अशावेळी त्यांना हात लावू नये, जवळ जाऊ नये अशा अनेक गोष्टींना बढावा दिला जातो. आजही मासिक पाळीदरम्यान महिलांना अपवित्र मानले जाते. देशाच्या अनेक भागांमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना मंदिरात, स्वयंपाकघरात जाण्यास मनाई आहे. भारतात मुलींना मासिक पाळी दरम्यान एकीकडे विचित्र वागणूक दिली जाते म्हणजेच त्यांना अस्पृश्य मानले जाते. दुसरीकडे, भारतातील अनेक राज्ये आहेत, जिथे हा टप्पा आनंदाच्या रूपात पाहिला जातो. दक्षिण भारत हा त्यापैकीच एक. तामिळनाडूमध्ये मासिक पाळी मुलीला पहिल्यांना आल्यानंतर ‘मंजल निरतु विजा’ म्हणतात. तो एक भव्य सोहळा आहे. यामध्ये सर्व नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या समारंभात मुलीचे काका नारळ, आंबा आणि कडुलिंबाच्या पानांपासून झोपडी बनवतात. यानंतर पाण्यात हळद मिसळून मुलीला आंघोळ घालतात. त्यानंतर मुलीला सिल्कची साडी नेसवली जाते. Mangalsutra : लग्नात नववधूला उलटं मंगळसुत्र का घालतात? मुलीच ते का घालतात? आंघोळ करून ती झोपडीत राहते. काकांनी बनवलेल्या झोपडीत स्वादिष्ट पदार्थ ठेवले आहेत. मंजल निरतु विजाचा हा उत्सव ‘पुण्य धनम्’ ने संपन्न होतो. यानंतर झोपडी काढली जाते. मासिक पाळीबद्दल इतिहास काय सांगतो? इतिहासकार नरेंद्र नाथ भट्टाचार्य यांच्या मते, पूर्वीच्या काळात महिलांना मासीकपाळी येणे शुभ मानले जात होते. यावेळी स्त्रियांना देवी म्हणून तिची पूजा केली जात असे. पूर्वीच्या काळी स्त्रिया मासिक पाळीत घातलेले कपडे पुरून टाकत. या कापडाचा वापर जादू करण्यासाठी केला जात असे. जुन्या काळात स्त्रियांना वेगळे ठेवले जात असे. यामागचे कारण अस्पृश्य नव्हते, तर याकाळात महिलांची काळजी घेणे होते. त्यांना कसलाही त्रास होऊ म्हणून त्यांना अन्न आणि सर्व गोष्टी जागेवर नेऊन देत असतं. महिलांना मंदिरात जाऊन पूजा करण्यास मनाई करण्यात आली होती. पण त्यामागचं कारण काही वेगळंच होतं. असं सांगितलं जातं की मासिक पाळीत पाय दुखतात आणि मंदिरं लांब असल्यामुळे तसेच गाडीची फारशी सुविधा नसल्यामुळे त्यांना मंदिरात जाण्यासाठी नाही सांगितले जायचे. पीरियड्स हा मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. असे म्हटले जाते की मासिक पाळी ही अशी वेळ असते जेव्हा एखादी मुलगी तिचा खरा प्रवास सुरू करते आणि परिपक्वतेकडे पहिले पाऊल टाकते.