नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : आजच्या जीवनशैलीत निराशा आणि तणावातून सुटका मिळवणं कठीण काम आहे. प्रत्येकाला, कोणत्या ना कोणत्या वेळी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तणाव जाणवतो. पण प्रश्न असा आहे की, त्या तणावातून कसे बाहेर पडायचे? काही लोक अशा परिस्थितीतून लवकर बाहेर पडतात, तर काही लोकांना त्यातून बाहेर यायला बराच वेळ लागतो. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते, खरं तर ही एक मानसिक स्थिती आहे, ज्यावर समस्या शोधल्याशिवाय काहीही करता येत नाही. अशा स्थितीत तज्ज्ञ एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपीची शिफारस करतात. जे मनाचे गुंफलेले धागे सोडवण्यास मदत करू शकतात. एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपीमध्ये उपचारासाठी शरीर आणि मनाचा समतोल राखण्यासाठी नृत्य, नाटक, संगीत आणि कला यासारख्या सर्व माध्यमांचा वापर केला जातो. यामध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून शरीराचा सर्जनशील वापर करून मनाची स्पष्टता, आठवणी, ताणतणाव आणि न सुटलेले प्रश्न बाहेर आणण्यास (Expressive Art Therapy) मदत होते.
एक्स्प्रेसिव्ह आर्ट थेरपीच्या सत्रात वॉर्मिंग अप एक्सरसाइज, संगीत आणि हालचालींद्वारे शरीर मोकळे करणे, रंग कलेद्वारे बॉडी माइंडफुलनेस, लेखन, कविता तसेच स्व-अभिव्यक्ती शिकवले जाते.
तज्ञ काय म्हणतात
एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपिस्ट रश्मी सिंग यांनी दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीत सांगितले की, अभिव्यक्ती कला ही कोणत्याही विशिष्ट कलेपेक्षा वेगळी असते. सामान्यतः कला शिकत असताना आपल्याला त्याची थोडीफार समज असणे अपेक्षित असते, परंतु अभिव्यक्त कला थेरपीचा भर फक्त मानसिक उपचारांवर असतो.
हे वाचा - Ration Card: रेशन केंद्रावर तुमचीही होतेय फसवणूक? त्वरित या क्रमांकावर करा संपर्क
उपचार कसे
एक्स्प्रेसिव्ह आर्ट थेरपिस्ट रश्मी सिंग यांच्या मते, महिला त्यांच्या समस्या लवकर स्वीकारतात, त्यामुळे त्या या थेरपीसाठी अधिक येतात. त्यांनी सांगितले की, शारीरिक आघात, बलात्कार, ऑटिझम, अपंगत्व अशा लोकांना डान्स थेरपी दिली जाते.
याशिवाय एखादा तरुण किंवा तरुणी नातेसंबंधामुळे मानसिक आघातातून जात असेल, तर त्याला मोफत लेखन चिकित्सा दिली जाते. या माध्यमातून अशा लोकांचे मन हलके करण्याचा प्रयत्न केला जातो.
हे वाचा - हनिमूनचा प्रत्येक क्षण संस्मरणीय करा; ‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर पत्नीही खूश
चिंताग्रस्त रुग्णांसाठी
एक्स्प्रेसिव्ह आर्ट थेरपिस्ट रश्मी सिंग सांगतात की, अनेकवेळा असे दिसून आले आहे की, काही लोकांमध्ये प्रतिभा असूनही ते आयुष्यात काही करू शकत नाहीत. खरं तर याचं कारण चिंता आहे. अशा लोकांना कला आधारित थेरपी दिली जाते, ज्याद्वारे रंग आणि स्केचेस वापरून त्यांची प्रतिभा बाहेर आणली जाते. लोकांना नैराश्यातून बाहेर येण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी प्रोत्साहित करणे हा त्याचा उद्देश असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips