Home /News /viral /

Traffic मधून बाहेर पडण्यासाठी बाईकस्वाराचा जबरदस्त जुगाड; काय केलं एकदा VIDEO पाहाच

Traffic मधून बाहेर पडण्यासाठी बाईकस्वाराचा जबरदस्त जुगाड; काय केलं एकदा VIDEO पाहाच

ट्रफिकमध्ये अडकलेल्या बाईकस्वाराने असं काही केलं की काहींना हसू आलं आहे तर काही जणांनी चिंता व्यक्त केली.

  मुंबई, 22 जून : सध्या धकाधकीच्या जीवनशैलीत तसा फारसा वेळ कुणालाच नाही. मग ते ड्रायव्हिंग करतानाही का असेना. कित्येक जण तर या घाईत वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन करताना दिसतात. काही काही जण तर काय करतील याचा नेम नाही (Bike video viral). सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका बाईकस्वाराने ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी जबरदस्त जुगाड केला आहे (Bike stuck in traffic video). हेव्ही ड्रायव्हर म्हणून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. @itz saini vimal इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो पाहून सुरुवातीला हसायलाच येईल पण हृदयाचा ठोकाही चुकेल (Mans driving bike below standing truck). व्हिडीओत पाहू शकता एक भलामोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. पादचारी या उभ्या ट्रकच्या खालूनच जाताना दिसत आहे. त्यांना जाताना पाहून मग बाईक चालकसुद्धा ट्रकखालून जाण्याचा प्रयत्न करतात. स्वतःसह बाईकलाही ट्रकखालून नेतात. हे वाचा - VIDEO : हातात साधा पॅन घेऊन खतरनाक मगरीला मारायला गेले आजोबा; धक्कादायक शेवट सुरुवातीला एक बाईकचालक असा प्रताप करतो. मग काय त्याच्या मागील बाईकचालकसुद्धा त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत पुढे जातात. या एका बाईकचालकाच्या मागे असे आणखी काही बाईकचालक दिसतात जे या ट्रकखालून जाण्याच्या तयारीत आहेत. जसं रेल्वेफाटक क्रॉस करावं, तसेच हे पादचारी आणि बाईकचालक ट्रक क्रॉस करत आहेत.
  हा व्हिडीओ पाहून आणि बाईकचालकाने लावलेलं डोकं पाहून अनेकांना हसू आवरत नाही आहे. हा व्हिडीओ मजेशीर व्हिडीओ म्हणून व्हायरल होतो आहे. तर काही जणांनी मात्र याबाबत चिंतासुद्धा व्यक्त केली आहे. हे वाचा - हिरोगिरी आली अंगाशी! छातीला गुंडाळून पेटवले फटाके, धक्कादायक शेवट; VIDEO VIRAL असं काही कारणं हे संकटापेक्षा कमी नाही. असा प्रताप जीवावरसुद्धा बेतू शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्ही तरी शहाणे व्हा. असा काही वेडेपणा करू नका हीच विनंती. कारण अति घाई संकटात नेई हे कायम लक्षात ठेवा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bike riding, Traffic, Viral, Viral videos

  पुढील बातम्या