मुंबई, 21 मार्च : देशात शनिवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलेल्याची माहिती मिळत आहे. 260 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. रविवारी जनता कर्फ्यू मोहीम राबवण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आता सर्वजण सतर्क झाले आहेत. मध्ये प्राण्यांपासून कोरोना होतो असा अफवांचा संदेश फिरत होता. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर माणसांपासूनच कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बकऱ्यांना मास्क चढवल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
ह्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता. बॅगराऊंडला कोरोना व्हायरसवर तयार केलेली गाणी प्ले होत आहेत आणि बकऱ्या आणि कुत्र्याला मास्क, पिशव्यांनी तोंड बांधलं आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी हे करण्यात आलं आहे. माणसांप्रमाणेच या प्राणांनाही त्याचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. अशा पद्धतीनं पहिल्यांदाच बकऱ्यांना आणि कुत्र्यांना मास्क लावून शेतात नेलं असावं. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 24 हजारहून अधिक लोकांनी हे व्हिडीओ लाईक केले आहेत.