लंडन, 31 जानेवारी : आपल्या घरामध्ये कोळ्याचं घर म्हणजे कोळ्याचं जाळं असतंच. कोपऱ्यातील ही जळमटं आपण कितीही स्वच्छ केली तरी आपल्याला वारंवार दिसतात. तरी जशी आपल्याला पाल, झुरळ यांची भीती वाटते, तितकी कोळ्यांची वाटत नाही. एक छोटासा कोळी फार फार तर काय करू शकणार, असंच आपल्याला वाटतं. पण तुम्ही विचारही केला नसेल इतका हा एवढासा कोळी भयंकर ठरू शकतो.याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे (Spider bite woman). एका छोट्याशा कोळ्याने महिलेची इतकी भयंकर अवस्था केली की तिला थेट रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली (woman reach hospital after Spider bite). ब्रिटनमधील 38 वर्षांच्या इओना मॅकनील. डिसेंबर मेक्सिकोमध्ये फिरायला गेली होती. ट्रॅकिंग करताना तिला एक कोळी चावला. त्यावेळी तिला जास्त वेदना झाल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी ती लंडनाला घरी परतली. तेव्हा मात्र तिची अवस्था भयंकर झाली. सकाळी उठताच तिला तिच्या गुडघ्यावर जखम झाल्याचं दिसलं. तिला उलट्या होऊ लागल्या आणि तीव्र वेदना सुरू झाल्या. कसंबसं करून ती रुग्णालयात गेली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ती थरथर कापू लागली. दोन वेळा बेशुद्धही झाली. हे वाचा - ‘घरात घुसू नकोस…’, चक्क सापालाच शेतकऱ्याने धमकावलं; पुढे जे घडलं ते शॉकिंग रिपोर्ट नुसार तिची अवस्था पाहता तिला तिथून ट्रॉपिकल डिसीज रुग्णालयात हलवण्यात आलं. सुरुवातीला उपचार करूनही तिच्यावर काही परिणाम दिसत नव्हतं. उपचाराच्या चौथ्या दिवसापासून तिची प्रकृती ठिक होऊ लागली आहे. कोळी चावल्याने मृत्यूच्या दारात गेली होती महिला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही कोळी चावल्याचं ऑस्ट्रेलियातील असंच एक प्रकरण समोर आलं होतं. जो नावाच्या 34 वर्षांच्या महिलेला कोळी चावला होता. टॉयलेट सीटवर बसताच टॉयलेटच्या आत लपून बसलेल्या कोळी तिच्या जांघेला चावला. तेव्हाच तिला इतक्या वेदना झाल्या की टॉयलेट सीटवरून ती किंचाळतच उठली आणि थेट रुग्णालयात पोहोचली. तिच्या जांघेजवळ जखम झाली होती. तिला चालायला आणि झोपायलाही त्रास होत होता. हा कोळी इतका विषारी होता की सुरुवातीला औषधही काम करत नव्हतं. एकाच आठवड्यात तिला तीन वेळा रुग्णालयात दाखल करावं जर ती लगेच रुग्णालयात गेली नसती तर तिचा जीवही गेला असता असं डॉक्टरांनी सांगितल्याचं ती म्हणाली होती. हे वाचा - आईनं 3 वर्षीय मुलीला अस्वलासमोर फेकलं; धावतच आला प्राणी अन्.., Shocking Video कोळ्यांच्या बऱ्याच प्रजाती आहेत. त्यापैकी काही विषारी आणि जीवघेण्याही असतात. त्यामुळे तुम्हीही कोळ्याला साधासुधा समजू शकता. कोळ्यापासूनही सावध राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.