मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Gorilla Glue मुळे आणखी एकाची झाली भयंकर अवस्था; ग्लूने तोंडाला कप चिकटवला आणि...

Gorilla Glue मुळे आणखी एकाची झाली भयंकर अवस्था; ग्लूने तोंडाला कप चिकटवला आणि...

Gorilla Glue बाबत जे काही सांगितलं जातं आहे, ते खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी या तरुणानं चॅलेंज घेतलं आणि प्रयोग केला. त्याच्या हा प्रयोग त्याच्या अंगलट आला.

Gorilla Glue बाबत जे काही सांगितलं जातं आहे, ते खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी या तरुणानं चॅलेंज घेतलं आणि प्रयोग केला. त्याच्या हा प्रयोग त्याच्या अंगलट आला.

Gorilla Glue बाबत जे काही सांगितलं जातं आहे, ते खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी या तरुणानं चॅलेंज घेतलं आणि प्रयोग केला. त्याच्या हा प्रयोग त्याच्या अंगलट आला.

वॉशिंग्टन, 17 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी अनेकदा लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासाठी ते कोणत्याही गोष्टीचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. पण अनेकदा अशा पद्धतीने फेमस होणं अनेकदा अंगलट आल्याचं देखील समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेनं गोरिला ग्लू (Gorilla Glue)  आपल्या केसांना लावला होता. यामुळे तिची काय अवस्था झाली ते तिनं सोशल मीडियावर सांगितलं. गोरिला ग्लूबाबत हे जे काही सांगितलं जातं आहे, ते खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी आणखी एका व्यक्तीनं Gorilla Glue challenge घेतलं आणि ते त्याला चांगलंच महागात पडलं आहे. लेन मार्टिन नावाच्या व्यक्तीनं Gorilla Glue चा प्रयोग केला. यासाठी त्याने एका पेपर कपवर हा ग्लू लावला आणि कप आपल्या तोंडावर चिकवटला. महत्त्वाचं म्हणजे त्याने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर अपलोड देखील केला. मी आता या कपवर हा ग्लू लावणार, तो तोंडाला लावणार आणि  लगेच तो आरामात काढणारदेखील, असं तो व्हिडीओत म्हणाला. त्याने तो कप आपल्या ओठांना लावल्यानंतर पुढे काय झालं हे व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळत नाही. पण याच व्हिडीओच्या पुढे त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये दिसतो आहे.
View this post on Instagram

A post shared by Len Martin (@lenise_martin3)

त्याच्या चॅलेंजचा त्याला खूप मोठा परिणाम भोगावा लागला आहे. याचा प्रचंड त्रास त्याला होऊ लागला. यामुळे त्यानं थेट हॉस्पिटल गाठलं.  त्याने हॉस्पिटलमधील आपला फोटो शेअर केला असून यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये बसलेला दिसून येत आहे. यामध्ये तो कप त्याच्या चेहऱ्यावर चिकटलेला दिसून येत आहे. हे वाचा - कसं शक्य आहे? तिच्या काखेतून निघतं दूध; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही हा प्रयोग करण्याच्या आधी त्याने या ग्लूबाबत जे काही सांगितलं जातं आहे ते सर्व खोटं आहे, असं सांगितलं होतं. पण आता हा प्रयोग त्याच्या अंगलट आल्यानंतर त्याने आपल्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचा या फसलेल्या प्रयोगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी त्याच्यावर दया दाखवण्याऐवजी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकाने त्याला फॉलो करू नका आणि त्याला जास्त प्रसिद्धी देऊ नका असं म्हटलं आहे तर एकाने आपण डोक्यात मेंदू चिकटवू शकत नसल्याचं म्हटलं आहे.
First published:

Tags: Experiment, Gorilla glue, Health, International, Lifestyle, Social media viral, Viral

पुढील बातम्या