भोपाळ, 06 डिसेंबर : आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. अमूक एखादी इच्छा पूर्ण झाली की तमूक करेन असा नवसही अनेक जण करतात. काही मंदिरांमध्ये एखादा नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्याची एक विशिष्ट पद्धत असते. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात इच्छापूर्तीसाठी एक तरुण चक्क हत्तीच्या पायाखालून गेला. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे.
तुम्ही पाहिलं असेल गणपतीच्या मंदिरात उंदराच्या कानात आपण आपली इच्छा सांगतो, शंकराच्या मंदिरात नंदीच्या दोन्ही शिंगावर आपली दोन बोटं ठेवून त्यातून आपण शंकराचं दर्शन घेतो. तसंच हा तरुण ज्या मंदिरात गेला होता तिथं हत्तीखालून जाण्याची परंपरा आहे. पण व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा तरुण हत्तीच्या मध्येच अडकला. त्याला पुढे जाता येत नाही आहे आणि मागेही पडता येत नाही. शरीराचा मधला भाग हत्तीच्या मधोमध अडकला आहे.
मंदिरातील पुजारी आणि इतक भाविक त्याला बाहेर पडण्याचे मार्ग सांगत आहेत. तसा तरुण फिरतानाही दिसतो आहे. कधी डाव्या बाजूला वळ, कधी उजव्या बाजूला वळ... असे त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. व्हिडीओ पाहून तरुणाची दयाही येते आणि हसूही आवरत नाही. व्हिडीओत या तरुणाचं पुढे काय झालं ते मात्र दिसत नाही. म्हणजे हा तरुण या हत्तीखालून बाहेर आला की नाही ते माहिती नाही.
काहींच्या मते हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील आहे तर काहींच्या मते गुजरातमधील.
हे वाचा - धक्कादायक! 'या' गावात एका मृत्यूनंतर 24 तासांत होतो दुसरा मृत्यू
तुम्हाला या व्हिडीओबाबत अधिक काही माहिती असेल किंवा तुमच्या पाहण्यात अशी एखादी घटना घडली असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Temple, Viral, Viral videos