मुंबई, 17 सप्टेंबर : मुक्या जीवांना बोलता येत नसलं तरी त्यांना माणसांची भाषा समजते. त्यांनी नीट प्रशिक्षण दिलं की त्यांना माणसं जे काही सांगतात ते सर्व समजतं. त्यामुळे तुम्ही मांजर, कुत्रे असे पाळीव प्राणी किंवा बऱ्याचदा पक्ष्यांशीही माणसांना संवाद साधताना पाहिलं आहे. बहुतेकांना अशा पशूपक्ष्यांशी मनमोकळ्या गप्पा मारायला आवडतं. पण तुमचं प्राण्यांवर कितीही प्रेम असलं, त्यांच्याशी तुम्हाला बोलायला आवडत असलं तरी तुमच्यासमोर सिंहासारखा खतरनाक प्राणी आणून ठेवला तर तुम्ही त्याच्याशी गप्पा माराल का? काय... फक्त कल्पनेनेच घाम फुटला ना? पण एका व्यक्तीने तशी हिंमत केली.
एका व्यक्तीने चक्क सिंहांशी गप्पा मारण्याची हिंमत केली. सिंह... जंगलाचा राजा... ज्याला जंगलातील भलेभले प्राणी घाबरतात. अशा सिंहाला पाहण्याची कितीतीही इच्छा असली तरी तो समोर आला की घाम फुटणारच. पण अशाच सिंहांसमोर छाती ताणत उभं राहून त्याच्याशी गप्पा मारण्याची डेअरिंग या व्यक्तीने केली. त्याच्यासोबत नंतर जे घडलं ते पाहूनच धडकी भरेल. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल.
हे वाचा - झुडपात दबा धरुन बसलेल्या सिंहाने घातली हरणावर झडप, पुढं जे घडलं.... पाहा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता दोन अवाढव्य सिंह दिसत आहेत. एक सिंह आणि एक सिंहिणी असं हे जोडपं आहे. त्यांच्यासमोर एक व्यक्ती उभी आहे. अगदी जसं मित्रमैत्रिणींसमोर उभं राहावं आणि त्यांच्याशी गप्पा मारावं तशी ही व्यक्ती या सिंहांशी गप्पा मारते आहे. या व्यक्तीने आपल्या अंगावरील जॅकेट काढून आपल्या हातात घेतलं आहे. सुरुवातीला सिंह त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण थोड्यावेळाने ते त्याच्यावर हल्ला करतात.
सुदैवाने सिंह त्याच्यावर एकच वार करतो आणि मागे हटतो. ती व्यक्ती तिथंच जवळच्या दगडावर बसते. आता सिंहाने असा हल्ला केल्यानंतरही आपण वाचलो म्हटल्यावर यानंतर तरी ही व्यक्ती शहाणी होईल. अशावेळी कुणीही आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून जीव मुठीत धरून तिथून पळ काढेल. पण ही व्यक्ती मात्र तिथंच बसून राहते. त्यानंतर सिंह पुन्हा तिच्यावर हल्ला करतो आणि तिचा हात आपल्या जबड्यात धरतो. यावेळीही ही व्यक्ती बचावतो. सिंह पुन्हा त्या व्यक्तीच्या पाय आपल्या जबड्यात घेतो आणि त्या व्यक्तीला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतो.
Man climbs into lion enclosure to "talk to the lions" pic.twitter.com/leSlYNzM29
— Idiots Nearly Dying (@IdiotsNearlydyi) September 12, 2022
अवघ्या 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यात तब्बल तीन वेळा सिंह त्या व्यक्तीवर हल्ला करताना दिसते आणि तिन्ही वेळा ही व्यक्ती बचावते. धक्कादायक म्हणजे तरी ती तिथून हटण्याचं काही नाव घेत नाही.
हे वाचा - OMG! सापालाही फुटली शिंगं; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @IdiotsNearlydyi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सिंहाशी गप्पा मारायला ही व्यक्ती सिंहांच्या क्षेत्रात घुसल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal