मुंबई, 16 सप्टेंबर- जंगलात जो सर्वांत शक्तिशाली आहे, तो नेहमी जिंकतो, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येकवेळी असंच घडत नाही. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जंगलातसुद्धा अनेकदा असंच घडत असावं, याची खात्री तुम्हाला नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच पटेल. या व्हिडिओमध्ये एका शक्तिशाली प्राण्याने त्याच्यापेक्षा कमी शक्तीशाली असणाऱ्या प्राण्यावर हल्ला केला. पण या कमी शक्तीशाली असणाऱ्या प्राण्याने त्याच्या चतुराईने स्वतःचा जीव वाचवला. हा व्हिडिओ आहे सिंहिण आणि हरणाचा . सोशल मीडियावर या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘न्यूज18 हिंदी’ची ‘वाइल्डलाइफ व्हायरल’ सीरिजमध्ये, आम्ही तुमच्यासाठी जंगल आणि वन्य प्राण्यांशी संबंधित आश्चर्यकारक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आज तुम्हाला ज्या व्हिडिओबद्दल आम्ही माहिती देणार आहोत, त्यामध्ये एक हरिण अत्यंत हुशारीने आपला जीव वाचवताना दिसत आहे. युट्युब चॅनल ‘मसाई साईटिंग्स’ हे आफ्रिकेतील जंगलातील थरारक आणि भीतीदायक व्हिडिओ पोस्ट करतं. या चॅनलवरीलच एका व्हिडिओची माहिती आज तुम्हाला देत आहोत. हरणाची शिकार करण्यासाठी सिंहिण दबा धरून बसते आणि पुढे… व्हिडिओमध्ये एक सिंहिण झुडपांमध्ये शिकारीसाठी दबा भरून बसल्याचं दिसतंय. तिला समोर एक हरिण दिसतं. ती दबक्या पावलांनी पुढे येते, आणि उभी राहते. जेव्हा तुम्ही सिंहिण शिकार करण्यासाठी ज्या पद्धतीने तयार आहे, हे पाहाल तेव्हा तुम्हालाही वाटेल ती नक्कीच शिकार पकडेल. पण येथे एकदम उलटंच घडतं. ती हरिण पकडण्यासाठी पुढे जाताच हरिण पळून जातं. खरं तर सिंहिण ही हरणापेक्षा जास्त वेगाने पळू शकते. परंतु, हरिण नेहमी झिगझॅग पद्धतीने धावतं. त्यामुळे सिंहिणला त्याचा पाठलाग करता येत नाही, व ती अवघ्या काहीवेळातच थांबते. मात्र, तोपर्यंत हरिण तिथून पळून जाण्यात यशस्वी होतं.
**(हे वाचा:** OMG! सापालाही फुटली शिंगं; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO ) व्हिडिओला मिळाले हजारो व्ह्युज या व्हिडिओला 34 हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. काहींनी व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘तिथे सिंहिण होती, त्यामुळे हरिण झिगझॅग पद्धतीने पळून जाण्यात यशस्वी झालं, जर चित्ता असता तर हरिण वाचलं नसतं, कारण चित्ताही अशाच पद्धतीने पळतो,’ अशी कमेंट एकाने दिली आहे. तर, ‘हरणांची शिकार करण्यासाठी सिंहांना त्यांच्या अगदी जवळ जावं लागतं, फक्त चित्ता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना दुरून पकडू शकतो,’ अशी कमेंटही एका व्यक्तीने दिली आहे.सिंहिण आणि हरणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र ‘शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ’ हे पटल्याशिवाय राहत नाही.