Home /News /viral /

कोरोनाबाधित पत्नीला कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी पतीची अफलातून शक्कल, पाहा जुगाडाचा VIDEO

कोरोनाबाधित पत्नीला कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी पतीची अफलातून शक्कल, पाहा जुगाडाचा VIDEO

एका व्यक्तीनं आपल्या कोरोनाबाधित पत्नीला (COVID-positive Wife) कोविड सेंटरमध्ये (Covid Center) दाखल करण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. योग्य सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी त्यांनी आपल्या चारचाकीला एक ट्रॉली जोडली आहे

    मिझोरम 04 जून : कोरोना काळात रुग्णालयात जागा न मिळाल्यानं किंवा रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यानं अनेकांनी आपल्या पद्धतीनं काहीतरी पर्याय शोधत रुग्णासाठीची व्यवस्था केली. अशाच आणखी एका जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इथे एका व्यक्तीनं आपल्या कोरोनाबाधित पत्नीला (COVID-positive Wife) कोविड सेंटरमध्ये (Covid Center) दाखल करण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. मिझोरममधील हा व्यक्ती आपल्या पत्नीला क्वारंटाईन सेंटरमध्ये घेऊन जात आहे. कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी या कपलनं मास्कचा वापर केला आहे. तसंच योग्य सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी त्यांनी आपल्या चारचाकीला एक ट्रॉली जोडली (Trailer Attached to Jeep)आहे. यावर त्यांनी निळ्या रंगाची एक खुर्ची ठेवली आहे. ही महिला ट्रॉलीमध्ये खुर्ची ठेवून त्यावर बसते. यानंतर ती आपल्या घरातील इतर सदस्यांचा निरोप घेते. एका फेसबुक युझरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं, की मिझोरममधील हा व्यक्ती आपल्या कोरोनाबाधित पत्नीला क्वारंटाईन सेंटरमध्ये घेऊन जात आहे. कोणत्याही परिस्थितीत पर्याय शोधत पुढे जाणं, हेच आपल्याला उत्तम कलाकार बनवतं आणि उत्साह कायम ठेवतं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. केवळ फेसबुकच नाही तर इतर प्लॅटफॉर्मवरही या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. या व्यक्तीची कल्पकता नेटकऱ्यांनाही आवडली आहे. कमेंट करत बहूमुल्य असं म्हटलं आहे. तर, एकानं कोरोना काळात लढवलेली उत्तम शक्कल म्हणत या व्हिडिओचं कौतुक केलं आहे. यासोबतच नेटकऱ्यांनी या महिलेच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही केली आहे. कोरोनाच्या काळात हा व्हिडिओ लोकांच्या चेहऱ्यावर हसू खुलवणारा आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Coronavirus, Videos viral

    पुढील बातम्या