मुंबई 27 डिसेंबर : हिवाळा सुरू आहे आणि अनेक भागांत कडाक्याची थंडी पडू लागली आहे. अनेकजण थंडीच्या दिवसांत फिरायला जातात, काही तीर्थयात्रेसाठी जातात. भाविक अनेक धार्मिकस्थळी भेट देऊन देवाचं दर्शन घेतात. देवदर्शनाला गेल्यावर काही ठिकाणी पवित्र नदी किंवा कुंडामध्ये स्नान करण्याची मान्यता असते. आता इतक्या थंडीत रोज अंघोळ करावसं वाटत नाही, अशा परिस्थितीत थंड पाण्यात डुबकी मारणं हे खूप आव्हानात्मक असतं. पण एका माणसाने अनेकांचं हे आव्हानात्मक काम सोपं केलंय. त्याची भन्नाट आयडिया पाहून तुम्हीही त्याचं कौतुक नक्कीच कराल. यंत्राच्या मदतीनं चक्क हवेत उडू लागला व्यक्ती, Video होतोय व्हायरल कडाक्याच्या थंडीमुळे लोकांसाठी गंगा-यमुनेत डुबकी मारणं सर्वांत अवघड काम आहे. पण एका माणसाने ही समस्या सोडवली आहे. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अगदी 10 रुपयांत त्याने ही समस्या सोडवली आहे. होय, तुम्हाला गंगास्नानासाठी नदीच्या थंड पाण्यात डुबकी घ्यायची नसेल, तर तुम्ही त्याला 10 रुपये द्या, तुमच्या वतीने तो थंड पाण्यात डुबकी घेईल. तुम्हाला पाण्यात जाण्याची गरजही पडणार नाही. तो तुमच्या नावाने पाण्यात डुबकी मारेल, त्यामुळे त्याचं पुण्यही तुम्हालाच मिळेल, असं तो तीर्थयात्रींना सांगत आहे.
इस मौसम का बेहतरीन ‘स्टार्टअप’ pic.twitter.com/SVjxsuLC8m
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) December 24, 2022
हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. 24 डिसेंबर रोजी आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी ‘या हंगामातील सर्वोत्तम स्टार्टअप’, असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ 26 सेकंदांचा आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की एक माणूस गंगा नदीच्या पात्रात उपस्थित आहे आणि मोठ्याने बोलत आहे. तो लोकांना ‘भावांनो, बहिणींनो! या थंडीच्या ऋतूत तुम्हाला नदीत डुबकी मारायची नसेल, अंघोळ करायची नसेल तर मी तुमच्या वतीने डुबकी मारेन आणि अंघोळही करेन. तुम्ही फक्त तुमचं नाव सांगा आणि 10 रुपयांची पावती फाडा. मी थंडीच्या दिवसांत तुमच्या नावाने मी डुबकी मारेन आणि त्याचं पुण्य तुम्हालाच मिळेल. फक्त तुम्ही जे 10 रुपये देताय, ते मला मिळतील. तर, भाऊ आणि बहिणींनो या. तुमच्या नावाची डुबकी मी मारेन, तेही फक्त आणि फक्त 10 रुपयांत,’ असं तो या व्हिडिओमध्ये म्हणतो आहे. ओला स्कुटरचा वापर असा ही? Video पाहून पोट धरुन हसाल या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय. तसंच हजारो लोकांनी यावर लाईक्सचा वर्षाव करत कमेंट्स केल्या आहेत. एका युजने यावर कमेंट केली आहे. कोण आहेत हे लोक, कुठून येतात? तर दुसर्याने लिहिलं, गरज हीच स्टार्टअपला जन्म देते. अनेकांनी यावर हसणाऱ्या इमोजी कमेंट्स केल्या आहेत. तर, काही नेटकऱ्यांनी त्याच्या या भन्नाट कल्पनेचं कौतुक केलं आहे.