मुंबई, 26 डिसेंबर: माणूस पक्ष्यांप्रमाणे हवेत उडू शकेल का, विमानाशिवाय हवाई प्रवास करु शकेल का असे प्रश्न तुम्हाला कधीतरी पडलेच असतील. पण भविष्यात या गोष्टी शक्य आहेत, असं जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. प्रगत तंत्रज्ञानामुळे भविष्यात माणूस पक्ष्यांप्रमाणे हवेत उडू शकणार आहे. या संदर्भातला एक प्रयोग नुकताच झाला असून, त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती जेटपॅक या जॅकेटच्या मदतीनं हवेत उड्डाण करताना दिसत आहे. यामुळे भविष्यात ट्रान्सपोर्ट अर्थात दळणवळण कशा पद्धतीचं असू शकतं, याचा एक अंदाजदेखील येतो.
जग वेगानं प्रगतीकडे झेप घेत आहे. तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाच यात मोठं योगदान आहे. रोज होणारे नवीन प्रयोग आणि शोध जगासमोर काही नवीन अनुभव घेऊन येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती जेटपॅकचा वापर करताना दिसत आहे. काळाच्या ओघात जगाने वाहतुकीची नवनवीन साधनं शोधून काढली आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपासून ते हवेत उडणाऱ्या विमानांपर्यंतच्या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाच्या जोरावर यशस्वी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत माणसाचं हवेत उडण्याचं स्वप्नही पूर्ण होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक व्यक्ती जेटपॅकच्या मदतीनं हवेत उडताना दिसत आहे.
हेही वाचा: प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यान माकडाची एन्ट्री; नवरदेवासोबत केलं असं काही की नवरीही शॉक, पाहा VIDEO
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत 2.5 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओला 52 हजारांपेक्षा जास्त लाइक्सदेखील मिळाले आहेत. अनेक युजर्सनं या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. तसंच अनेक युजर्स हा व्हिडिओ शेअर करतानादेखील दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video viral, Videos viral, Viral news