जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 'कार अॅंड बाईक डॉट कॉम'ची 'हीरो इलेक्ट्रिक'शी भागीदारी, इलेक्ट्रिक वाहनांच्या बुकिंगवर अनोखे लाभ

'कार अॅंड बाईक डॉट कॉम'ची 'हीरो इलेक्ट्रिक'शी भागीदारी, इलेक्ट्रिक वाहनांच्या बुकिंगवर अनोखे लाभ

'कार अॅंड बाईक डॉट कॉम'ची 'हीरो इलेक्ट्रिक'शी भागीदारी, इलेक्ट्रिक वाहनांच्या बुकिंगवर अनोखे लाभ

‘हीरो इलेक्ट्रिक’चे ग्राहक ‘कार अॅंड बाईक डॉट कॉम’वर आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीची नोंदणी करू शकतील आणि आपल्या नजीकच्या ‘हीरो इलेक्ट्रिक’ रिटेल विक्रेत्यामार्फत टेस्ट ड्राइव्ह व स्कूटरची डिलिव्हरी घेऊ शकतील. ‘कार अॅंड बाईक डॉट कॉम’च्या माध्यमातून दुचाकी घेणाऱ्या ‘हीरो इलेक्ट्रिक’च्या ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात येतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 22 डिसेंबर : ‘महिंद्रा फर्स्ट चॉईस’चा ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेल्या, ‘कार अॅंड बाईक डॉट कॉम’ (carandbike.com) या वेबसाईटने इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) निर्मितीत भारतात अव्वल असलेल्या ‘हीरो इलेक्ट्रिक’ या (Hero Electric) कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी वाहने (Two Wheeler Vehicle) पोर्टलवरून विकण्यासंदर्भात करार केला आहे. देशातील 300हून अधिक शहरांमध्ये ‘महिंद्रा फर्स्ट चॉईस’कडील 5 हजारांहून अधिक जुनी वाहने सादर करीत ‘कार अॅंड बाईक डॉट कॉम’ने ई-कॉमर्स क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आणि आता इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या उत्पादकांना आपल्या पोर्टलचा उपयोग करून देऊन आपल्या दर्शकांना ती वर्धित सेवा पुरवणार आहे. या सहयोगामुळे ‘हीरो इलेक्ट्रिक’चे ग्राहक ‘कार अॅंड बाईक डॉट कॉम’वर आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीची नोंदणी करू शकतील आणि आपल्या नजीकच्या ‘हीरो इलेक्ट्रिक’ रिटेल विक्रेत्यामार्फत टेस्ट ड्राइव्ह व स्कूटरची डिलिव्हरी घेऊ शकतील. ‘कार अॅंड बाईक डॉट कॉम’च्या माध्यमातून दुचाकी घेणाऱ्या ‘हीरो इलेक्ट्रिक’च्या ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात येतील. या महत्त्वपूर्ण भागीदारीबद्दल ‘महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील्स लिमिटेड’चे सीईओ व एमडी आशुतोष पांडे म्हणाले, “कार अॅंड बाईक’च्या ऑनलाइन युज्ड कार पोर्टलच्या यशस्वी सादरीकरणानंतर, आम्हाला आता ‘हीरो इलेक्ट्रिक’च्या इलेक्ट्रिक दुचाकी श्रेणीसाठी ऑनलाइन भागीदार म्हणून सहयोग करताना आनंद होत आहे. ग्राहक इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर स्वीकारत असल्याचे यावर्षी दिसून येत आहे. अशा वेळी भारतातील सर्वात मोठ्या विद्युत दुचाकी उत्पादक कंपनीसोबत भागीदारी करण्याने आमचे ऑनलाइन अस्तित्व अधिक बळकट होणार आहे. नवीन व जुन्या वाहनांचा एक सर्वसमावेशक स्वरुपाचा रिटेल विक्रेता बनण्याच्या आमची कटिबद्धता यातून दृढ होणार आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीवर आणि ‘कार अॅंड बाईक’ या ऑटोमोटिव्ह ई-कॉमर्स ब्रँडवर ओईएम व ग्राहक यांचा असलेला विश्वास या भागीदारीतून व्यक्त होईल.” ‘हीरो इलेक्ट्रिक’चे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले, “ऑनलाइन आणि ऑफलाइनचे मिश्रण असलेल्या हायब्रीड विक्री मॉडेलमध्ये आम्ही 2020 च्या सुरुवातीस आलो, तेव्हापासून आम्हाला या पद्धतीमध्ये प्रचंड क्षमता दिसून आली आहे. या हायब्रिड विक्री पद्धतीमुळे आमच्या वितरक भागीदारांना ग्राहकांचा व्यापक आधार मिळेल, तसेच वाहनांसाठीची नोंदणीही मोठ्या प्रमाणात होईल. ‘कार अॅंड बाईक’ व ‘महिंद्रा फर्स्ट चॉईस’ यांच्याशी होणाऱ्या भागीदारीमुळे, वाहन उद्योगातील त्यांच्या कौशल्यासोबतच त्यांच्या व्यापक बाजारपेठेचा लाभही आम्हाला मिळू शकेल. देशात अधिकाधिक ग्राहक विद्युत वाहनांकडे वळावेत आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचावे, अशी परिस्थिती निर्माण होण्याबाबत आम्ही उत्सुक आहोत.” ‘हीरो इलेक्ट्रिक’ ही कंपनी मोठ्या ग्राहकसंख्येला प्रवासाच्या विस्तृत स्वरुपाच्या सुविधा पुरवते. या ब्रॅंडच्या विद्युत वाहनांच्या ताफ्यातील फोटॉन, ऑप्टिमा व अॅट्रिया यांसारखी उत्पादने पोर्टलमधून प्रदर्शित होणार आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात