जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शुद्ध म्हणून या अशा बाटल्यांमधील पाणी बिनधास्त पित आहात; तर हा VIDEO एकदा पाहाच

शुद्ध म्हणून या अशा बाटल्यांमधील पाणी बिनधास्त पित आहात; तर हा VIDEO एकदा पाहाच

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : या फोटोत ज्या पाण्याच्या बाटल्या पाहत आहात, अशा बाटल्यांतील पाणी तुम्ही कधी ना कधी किंबहुना दररोजही पित असाल. ऑफिस, दुकान, हॉटेल अशा बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी अशा बाटल्या असतात. काही लोक तर घरीसुद्धा पिण्याचं पाणी म्हणून अशा बाटल्या मागवतात. या वॉटर बॉटल दिसल्या की हे पाणी शुद्ध असं आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि बिनधास्त हे पाणी पितो. पण अशाच बाटल्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पाण्याच्या या बाटल्यांचा असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहूनच तुम्हाला उलटी येईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित अशा बाटल्यांमधील पाणी तुम्ही पिण्यासाठी काय हात धुण्यासाठीही वापरणार नाहीत. असं या शुद्ध पाण्यांच्या बाटल्यांचं नेमकं सत्य आहे तरी का, हे आता तुम्हालाही पाहायचं असेल. तर हा व्हिडीओ पाहा. हे वाचा -  उष्ट नको म्हणून वरून पाणी पिता? ही सवयसुद्धा ठरू शकते हानीकारक; डॉक्टरांनीच सांगितले याचे दुष्परिणाम व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी या बाटल्या धुतल्या जात आहेत. पाइपचं पाणी या बाटल्यांवर सोडलं जात आहे. एका व्यक्तीने एका हातात पाण्याचा पाइप आणि दुसऱ्या हातात पाण्याची ही बाटली धरली आहे आहे. बाटलीवर पाइपने सर्वबाजूंनी पाणी टाकून या बॉटल्स वॉश केल्या जात आहे. पण त्यानंतर ही व्यक्ती करते ते धक्कादायक आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर पाण्याने पाण्याच्या बाटल्या स्वच्छ धुणारी ही व्यक्ती चक्क या बाटलीत थुकते. बाटलीच्या आत ती थुंकताना दिसते. तिथंच असलेल्या कुणीतरी त्याचं हे किळसवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा -  पाण्याच्या बाटलीवर अशा रेषा का बनवल्या जातात? डिझाइन नाही तर यामागचं कारण दुसरंच भाजपचे माजी मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि नेमका कुठला आहे, याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही आहे. पाणी जिहाद इतकंच कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

जाहिरात

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना धक्का बसला आहे. यावर कारवाई होण्याची मागणी होऊ लागली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात